22.2 C
Latur
Tuesday, September 10, 2024
Homeलातूरनिलंगा येथे दोन तास रस्ता रोको

निलंगा येथे दोन तास रस्ता रोको

निलंगा : प्रतिनिधी
 मालवण येथील राजकोट किल्याजवळ छत्रपती शिवाजी महाराज पुतळा कोसळल्या प्रकरणी निलंगा महाविकास आघाडीकडून प्रदेश सचिव अभय साळुंके यांचे पुढाकारातून निलंगा येथे रास्ता रोको करून निषेध व्यक्त करीत कामात  कमिशन खाणा-या व निष्कृष्ट दर्जाचे काम करणा-या निर्लज्ज लोकप्रतिनिधींचा व अधिका-यांंचा तीव्र निषेध करण्यात आला.
     यावेळी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर म्हणाले की, सिंंधुदुर्गातील मालवण येथील राजकोट क्ल्यिावर उभारलेला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ४ डिसेंबर २०२३ रोजी करण्यात आले होते. त्याठिकाणी बसविण्यात आलेला महाराजांचा पुतळा एक वर्षातच कोसळला. यावरून पुतळ्यााचे काम निकृष्ट दर्जाचे झाले होते हे उघड आहे. देशाचे पंतप्रधान जेंव्हा एखाद्या स्मारकाचे तथा वास्तूचे उद्घाटन करतात तेंव्हा त्याचे काम दर्जेदारच असेल अशी जनतेला खात्री असते परंतु सिंधुदुर्गातील मालवण येथील राजकोट किल्लयावर उभारलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा वर्षभरातच कोसळला.हा छत्रपती शिवरायांचा अवमान आहे. याची जबाबदारी हा पुतळा उभारणा-या संस्थेबरोबर संबंधित खात्याचे  मंत्री व प्रधान सचिवांचीही आहे त्यामुळे याची एसआयटी नेमून चौकशी झाली पाहिजे, असे ते म्हणाले. देशातील व राज्यातील भ्रष्ट सरकारला उखडून टाकण्यासाठी लोकसभेच्या निवडणुकीप्रमाणे विधानसभेच्या निवडणुकीतही परिवर्तन करावे. शहरातील व्यापा-यांंवर खोटे गुन्हे दाखल केलेल्या दुटप्पी लोकप्रतिनिधी व प्रशासनावर टीकेची झोड साळुंके यांनी उडविली.
आपला शेतकरी संकटात अडकलेला आहे. शेतक-यांंच्या मालाला भाव नाही त्यासाठी सरकारने लक्ष घालून सोयाबीनला ९००० हजार रुपयांचा भाव द्यावा व हमीभावाने खरेदी करावी, अशी त्यांनी मागणी केली. यावेळी शिवसेनेच्या वतीने शोभाताई बेंजरगे, माजी सभापती अजित माने, शिवसेना तालुका प्रमुख अविनाश रेशमे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सुधीर मसलगे, तालुकाध्यक्ष विजय पाटील,  सेल.उपाध्यक्ष लक्ष्मण कांबळे, कॉंग्रेसचे प्रा.दयानंद चोपणे, दिलीप ढोबळे, अ‍ॅड. नारायण सोमवंशी, पंकज शेळके, शहराध्यक्ष मुजीब सौदागर, प्रदेश कॉंग्रेसचे ओबीसी संघटक अजित ंिनंबाळकर, व्यापारी महासंघाचे उपाध्यक्ष अंबादास जाधव यांनीही भावना व्यक्त केली.
    यावेळी डॉ. सेलचे जिल्हाध्यक्ष अरंिवंद भातांबरे, तालुकाध्यक्ष विजय पाटील, शिरूर अनंतपाळ तालुकाध्यक्ष आबासाहेब पाटील, माजी नगराध्यक्ष हमीद शेख, शहराध्यक्ष अजित नाईकवाडे, निलंगा विद्यार्थी युवक अध्यक्ष अमोल सोनकांबळे, राष्ट्रवादीचे इस्माईल लदाफ, माजी नगरसेवक सिराज देशमुख, जिल्हाउपाध्यक्ष सुधाकर पाटील, किसान सेलचे संजय बिराजदार, निवृत्त अधिकारी व्यंकटराव शिंंदे, युवा सेने तालुका प्रमुख प्रशांत वांजरवाडे, चक्रधर शेळके, सुभाष पाटील, दिनकर बिराजदार, छावाचे दास साळुंके, एफरोज शेख, बालाजी गोमासाळे, गंगाधर चव्हाण, विठ्ठल पाटील, ंिल्ांबराज जाधव, सतीश कोणिरे, युवक तालुकाध्यक्ष मदन बिरादार, माधवराव पाटील, विक्रम जाधव, ज्ञानेश्वर ंिपंड, परमेश्वर सूर्यवंशी यांच्यासह महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी, विविध फ्रंट सेलचे पदाधिकारी, सेवा दल, युवक पदाधिकारी व कार्यकर्ते, नागरिक हजारोंच्या  संख्येनं उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR