निलंगा : प्रतिनिधी
येथील नगर पालिकेच्या सफाई कामगारांनी गेल्या सहा महिन्यांचा पगार न केल्यामुळे दि ११ ऑगस्ट रोजी उपविभागीय कार्यालयासमोर उपोषणास बसले आहेत. निलंगा येथील नगरपालिकेच्या सफाई कामगारांनी जोपर्यंत आमच्या पगारी होत नाहीत तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही, असे सांगत गेल्या तीन दिवसांपासून शहरातील कचरा संकलन करणे बंद केल्यामुळे शहरातील घराघरात कच-याचे ढिगारे दिसून येत आहेत. गेल्या सहा महिन्यापासून कंत्राट दाराने सफाई कामगाराच्या पगारी न केल्यामुळे कामगारावर उपासमारीची वेळ आली आहे .सहा महिने पगारी न केल्यामुळे आमचे घर प्रपंच कसे चालणार आमचा उदरनिर्वाह व्हायचा कसा, आम्ही जगायचे कसे असा संतप्त सवाल करीत ते उपोषणास बसले आहोत.
सदरील मागण्या मान्य नाही झाल्यास यापुढील काळात तीव्र आंदोलन करू, असा इशारा उपोषणकर्त्यांनी दिला आहे. या उपोषणास कोमलबाई कदम, बकुळाबाई कांबळे, कमलाबाई सुरवसे, शारदाबाई सुरवसे, कुर्लाबाई सुरवसे, शारदाबाई सुरवसे, सुनिता कांबळे,कमलाबाई सुरवसे, रोशनी शिंदे, सोजराबाई शिंदे, कांताबाई सुरवसे, वनिता सुरवसे, उज्वला शिंदे, जानकाबाई कांबळे, शेषाबाई कांबळे, कस्तुराबाई कांबळे, विमला कांबळे, पवित्रा कांबळे, सुमित्रा शिंदे, अरुणा सुरवसे, वंदना कदम, विठाबाई कांबळे, फुलाबाई कांबळे, सुमित्रा शिंदे, मिनाबाई कांबळे, कौशल्या कांबळे, आशाबाई कांबळे, लक्ष्मीबाई घोलप आदी महिलासह निळकंठ जाधव, हाजी देशमुख, बालाजी सुरवसे यांच्यासह ६८ कर्मचारी बसले आहेत. लातूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दौरा असल्यामुळे एकही अधिकारी उपोषणस्थळी फरकले नाहीत.

