निवडणूक आयोगावरील फेक नॅरेटिव्ह उध्वस्त : अशोकराव चव्हाण

नांदेड : प्रतिनिधी
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या तीनही आयुक्तांनी संयुक्तपणे जारी केलेल्या निवेदनामुळे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि त्यांच्या सहका-यांनी निर्माण केलेला फेक नॅरेटिव्ह उध्वस्त झाला आहे, असा दावा खासदार अशोकराव चव्हाण यांनी केला. निवडणूक आयोगातील सर्व प्रक्रिया एकमताने झाल्या असून, आयुक्तांमध्ये कोणताही मतभेद नसल्याचे संयुक्त निवेदनातून स्पष्ट झाल्याचे त्यांनी सांगितले.

नांदेड येथे आयोजित पत्रकार परिषदेत चव्हाण यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली. संविधान हातात घेऊन संवैधानिक संस्थांवर सातत्याने प्रश्नचिन्ह निर्माण करणे योग्य नाही. संविधानाने निर्माण केलेल्या संस्थांवरील जनतेचा विश्वास कमी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. कॅबिनेट सेक्रेटरींकडे पाठवण्यात आलेले पत्र कोणत्याही धोरणात्मक विषयाशी संबंधित नव्हते, तर डेप्युटेशनवरील नियुक्तीशी संबंधित होते. मात्र, या पत्राला वेगळे स्वरूप देऊन निवडणूक आयोगामध्ये मतभेद असल्याचा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे चव्हाण म्हणाले. फॉर्म क्रमांक ६ संदर्भातही जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. सर्वोच्च न्यायालयाने ज्या स्वरूपातील फॉर्म क्रमांक ६ वैध ठरवला आहे, त्याच स्वरूपात त्याचा वापर केला जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पराभव झाला की आरोप
निवडणुकीत विजय मिळाला की निवडणूक आयोग योग्य आणि पराभव झाला की आयोगावर आरोप, अशी भूमिका काँग्रेसने सोडली पाहिजे, असे चव्हाण म्हणाले. तेलंगणा, पंजाब, हिमाचल प्रदेश आणि कर्नाटक येथे विजय मिळाल्यानंतर हाच निवडणूक आयोग योग्य होता; मग भाजप विजयी झाल्यानंतरच आयोगावर प्रश्न का उपस्थित केले जात आहेत, असा सवाल त्यांनी केला. ईव्हीएमबाबतही सातत्याने आरोप करण्यात आले. तर मतचोरी चे आरोप करणा-यांनी आधी आत्मपरीक्षण करावे. जनतेने नाकारल्यानंतर प्रत्येक पराभवाचे खापर निवडणूक आयोगावर फोडणे हा जनतेच्या निर्णयाचा अवमान असल्याचे ते म्हणाले. जनतेचे प्रश्न घेऊन जनतेमध्ये गेल्यास जनता प्रतिसाद देते, असा टोलाही त्यांनी लगावला.

या पत्रकार परिषदेला भाजप महानगराध्यक्ष आ. अमरनाथ राजूरकर, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आमदार डॉ. तुषार राठोड, प्रदेश उपाध्यक्ष चैतन्यबापू देशमुख, महापौर कविता मुळे, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. किशोर देशमुख, नांदेड डॉ. संतुकराव हंबर्डे, डॉ. सचिन उमरेकर आणि प्रवक्ते निलेश देशमुख उपस्थित होते.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nana Patekar Speech|अभिनेते नाना पाटेकर आपल्या भाषणात भावूक का झाले? काय म्हणाले
24:31
Video thumbnail
Nana Patekar|ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं निधन; वयाच्या ७५व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
01:31
Video thumbnail
Nanded|निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्यासह SIRविरोधात इंडिया आघाडीचा नांदेडमध्ये मोर्चा
03:34
Video thumbnail
लातूरच्या कन्हेरी चौकातून अपहरण करत बर्दापूर येथील खडी केंद्रावर मारहाण; ३२वर्षीय तरुणाचा मृत्यू
02:56
Video thumbnail
Nanded|डॉक्टर होण्याचं स्वप्न, हातात विळा! MBBS विद्यार्थी आईसोबत सोयाबीन काढतोय
03:40
Video thumbnail
Nanded|नांदेडमध्ये पाणी चोरीविरोधात धडक कारवाई; ५ दिवसांत ४०० मोटारींची कनेक्शन कट
02:36
Video thumbnail
Latur|आदर्शवर बुलडोझर फिरणार? फरार बशीर शेखच्या अडचणी वाढल्या!
03:39
Video thumbnail
Latur|ठाकरे चौकातील कोयता हल्ल्यानंतर पोलिस ॲक्शन मोडवर; शहरात सरप्राईज नाकेबंदी
03:41
Video thumbnail
शिक्षक द्या, नाहीतर कार्यालयातच शाळा! शिरूर अनंतपाळमध्ये शाळा व्यवस्थापन समितीचे अनोखे आंदोलन
02:56
Video thumbnail
Latur|दुष्काळात लाखो लिटर पाणी आगीवर नियंत्रणासाठी खर्च; आग लागू नये म्हणून कोणती काळजी घ्यावी?
06:18
Video thumbnail
Latur|एकमत डिजिटलच्या बातमीचा दणका! अखेर चायनीज सेंटर दुकानदाराला न्याय
05:27
Video thumbnail
Latur|१३ तासांच्या झुंजीनंतर कचरा डेपोची आग नियंत्रणात; ३८ तासांनंतरही धुराचे लोट कायम!
04:02
Video thumbnail
ऐन दुष्काळात शेतकऱ्यावर चोरट्यांचा दरोडा; पाटोदा बुद्रुकमधून ३ दुभत्या म्हशी पळवल्या
02:22
Video thumbnail
mpsc विद्यार्थ्यांच्या आंदोलनातून आमदार रोहित पवार लाईव्ह
18:54
Video thumbnail
पंचनाम्याचा फार्स थांबवा, थेट बँक खात्यात मदत टाका; शिरूर अनंतपाळमधील शेतकऱ्यांची आक्रमक मागणी!
02:03

Latest news