निवडणूक आयोगाविरोधात काँग्रेसचा विराट एल्गार

लातूर : प्रतिनिधी
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कथित मनमानी, पक्षपाती आणि हुकूमशाही कारभाराविरोधात लातूर जिल्हा काँग्रेस कमिटी व लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने दि. २८ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे तीव्र निदर्शने करण्यात आली. लातूरचे खासदार डॉ. शिवाजी काळगे यांच्या प्रमुख उपस्थितीत तर जिल्हाध्यक्ष अभय साळुंके व शहर जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. शिवाजी जवळगेकर यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या आंदोलनात काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी निवडणूक आयोगासह केंद्र सरकारविरोधात ‘ज्ञानेश कुमार हटाव, देश बचाव’, अशी जोरदार घोषणाबाजी करत संपूर्ण परिसर दणाणून सोडला.
जिल्हाध्यक्ष अभय साळुंके यांच्याकडून अत्यंत आक्रमक पद्धतीने आयोगाच्या कारभाराची पोलखोल लातूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अभय साळुंके यांनी आपल्या आक्रमक शैलीत आंदोलनाला संबोधित केले, यावेळी बोलताना ते म्हणाले की, देशात अतिशय पद्धतशीर आणि पूर्वनियोजित (प्री-प्लॅन) व्होट चोरी सुरू आहे. घटनेनुसार राष्ट्रपती, राज्यपाल, सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना केवळ ते पदावर असेपर्यंतच कायदेशीर संरक्षणाची मुभा असते; मात्र २०२३ मध्ये केंद्र सरकारने नवीन कायदा करून निवडणूक आयुक्तांना निवृत्तीनंतरही कोणत्याही कारवाईपासून संरक्षण बहाल केले आहे. असे संरक्षण देऊन त्यांच्याकडून चुकीचे व बेकायदेशीर कामकाज करवून घेतले जात असल्याचा थेट आरोप त्यांनी केला. गेल्या दहा महिन्यांच्या काळात आयोगाच्या बैठकांची कोणतीही विषयपत्रिका (अजेंडा) किंवा इतिवृत्त न ठेवता ज्ञानेश कुमार यांनी एकतर्फी निर्णय लादले आहेत. देशातील लोकशाही व मतदानाचा अधिकार धोक्यात आणणा-या मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी तात्काळ राजीनामा द्यावा आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी, अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली.
या आंदोलनात विविध पदाधिका-यांनी निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आपली भूमिका मांडत त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी, अशी मागणी केली. शहर जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. शिवाजी जवळगेकर यांचा इशारा आंदोलनाच्या शेवटी लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रा. डॉ. शिवाजी जवळगेकर यांनी निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या या संपूर्ण बेकायदेशीर कृत्याचा निषेध करत उपस्थित सर्व पदाधिका-यांचे आभार मानले. तसेच, आगामी काळात ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा दिला नाही आणि त्यांच्यावर कारवाई झाली नाही, तर हे आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल, असा सज्जड इशारा त्यांनी दिला.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या सूचनेनुसार, माजी मंत्री, आमदार अमित विलासराव  देशमुख, लातूरचे खासदार डॉ. शिवाजी काळगे आणि लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष धिरज विलासराव देशमुख  यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या आंदोलनात महापौर जयश्री सोनकांबळे, प्रदेश सचिव अ‍ॅड. समद पटेल, विद्याताई पाटील, डॉ. दिनेश नवगिरे, एन. आर. पाटील, सचिन बंडापल्ले, विजयकुमार साबदे, मोईन सय्यद, जिल्हा उपाध्यक्ष गंगासिंह कदम, प्रभाकर बंडगर, गोविंद बोराडे, मारुती पांडे, विलास पाटील चाकूरकर, दत्तोपंत सूर्यवंशी, जि. प. सदस्य दत्ता टेकाळे, शिवानंद पाटील, शीलाताई पाटील, सुनिता आरळीकर, सईताई गोरे, सोनाली थोरमोटे, डॉ. अंजुम कादरी, योगिता जाधव, सुभाष जाधव, प्रमोद मरुरे, दिपाली आदमाने, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष निलेश देशमुख, शहराध्यक्ष विष्णुदास धायगुडे, एन. एस. यू.आय. जिल्हाध्यक्ष रोहित बिरादार, सेवादल जिल्हाध्यक्ष अनिल चव्हाण, विजयकुमार पाटील, सचिन पाटील, अजित माने, पंकज शेळके, विजयकुमार पाटील, चंद्रकांत मद्दै, सुधाकर पाटील, आबासाहेब पाटील उजेडकर, गोपाळ भंडे, प्रमोद कापसे, उमेश बेद्रे, संतोष बिरादार, किरण बाबळसुरे नगरसेविक इसरार सगरे, अहेमद खान पठाण, तब्बसूम शेख, श्रावणी झिपरे, पवन सोलंकर, डॉ. बालाजी साळुंखे, सतीश साळुंखे, मनोज थोरात, गिरीश ब्याळे, संजय ओहळ, असलम शेख, प्रा. प्रवीण कांबळे, राम स्वामी, अ‍ॅड. देविदास बोरुळे, आयुब मणियार, वैजनाथ लूल्ले, अकबर माडजे, राम भंडारे अनिल पाटील, संजय पाटील खंडापूरकर, बालाजी वळसांगवीकर, प्रा. सुधीर अनवले, मतीन सय्यद, अनुसूचित जाती विभागाचे प्रा. प्रवीण कांबळे, पद्माकर वाघमारे, मोहन माने, पवनकुमार गायकवाड, नरसिंग कांबळे, बब्रूवान गायकवाड, मैनोदिन शेख, आनंद वैरागे, अभिषेक देशमुख, पाशा शेख, फारुख शेख, अप्पासाहेब हुडे, राजु गवळी, विजय टाकेकर, सिद्धांत कांबळे, श्रीमंत गायकवाड यांच्यासह जिल्हा कार्यकारिणी, विविध फ्रंटल ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, सहकारी संस्थांचे पदाधिकारी, नगरसेवक, जि. प., पं. स. सदस्य यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nana Patekar Speech|अभिनेते नाना पाटेकर आपल्या भाषणात भावूक का झाले? काय म्हणाले
24:31
Video thumbnail
Nana Patekar|ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं निधन; वयाच्या ७५व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
01:31
Video thumbnail
Nanded|निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्यासह SIRविरोधात इंडिया आघाडीचा नांदेडमध्ये मोर्चा
03:34
Video thumbnail
लातूरच्या कन्हेरी चौकातून अपहरण करत बर्दापूर येथील खडी केंद्रावर मारहाण; ३२वर्षीय तरुणाचा मृत्यू
02:56
Video thumbnail
Nanded|डॉक्टर होण्याचं स्वप्न, हातात विळा! MBBS विद्यार्थी आईसोबत सोयाबीन काढतोय
03:40
Video thumbnail
Nanded|नांदेडमध्ये पाणी चोरीविरोधात धडक कारवाई; ५ दिवसांत ४०० मोटारींची कनेक्शन कट
02:36
Video thumbnail
Latur|आदर्शवर बुलडोझर फिरणार? फरार बशीर शेखच्या अडचणी वाढल्या!
03:39
Video thumbnail
Latur|ठाकरे चौकातील कोयता हल्ल्यानंतर पोलिस ॲक्शन मोडवर; शहरात सरप्राईज नाकेबंदी
03:41
Video thumbnail
शिक्षक द्या, नाहीतर कार्यालयातच शाळा! शिरूर अनंतपाळमध्ये शाळा व्यवस्थापन समितीचे अनोखे आंदोलन
02:56
Video thumbnail
Latur|दुष्काळात लाखो लिटर पाणी आगीवर नियंत्रणासाठी खर्च; आग लागू नये म्हणून कोणती काळजी घ्यावी?
06:18
Video thumbnail
Latur|एकमत डिजिटलच्या बातमीचा दणका! अखेर चायनीज सेंटर दुकानदाराला न्याय
05:27
Video thumbnail
Latur|१३ तासांच्या झुंजीनंतर कचरा डेपोची आग नियंत्रणात; ३८ तासांनंतरही धुराचे लोट कायम!
04:02
Video thumbnail
ऐन दुष्काळात शेतकऱ्यावर चोरट्यांचा दरोडा; पाटोदा बुद्रुकमधून ३ दुभत्या म्हशी पळवल्या
02:22
Video thumbnail
mpsc विद्यार्थ्यांच्या आंदोलनातून आमदार रोहित पवार लाईव्ह
18:54
Video thumbnail
पंचनाम्याचा फार्स थांबवा, थेट बँक खात्यात मदत टाका; शिरूर अनंतपाळमधील शेतकऱ्यांची आक्रमक मागणी!
02:03

Latest news