18.4 C
Latur
Friday, December 5, 2025
Homeमहाराष्ट्रनिवडणूक आयोग अपंग ; यशोमती ठाकूर यांची टीका

निवडणूक आयोग अपंग ; यशोमती ठाकूर यांची टीका

अमरावती : प्रतिनिधी
यशोमती ठाकूर यांनी नुकत्याच जाहीर झालेल्या महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांवरून निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ‘निवडणूक आयोग अपंग झालेला आहे, पॅरालिटिक आहे, पॅरासाईट म्हणून तो काम करतो. निवडणूक आयोग ही एक स्वायत्त संस्था असूनही, ती व्यवस्थित काम करत नाही, हे आता सिद्ध झाले आहे, असे यशोमती ठाकूर यांनी म्हटले आहे.

मतदार यादीतील त्रुटींवरून निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले जात आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देशासमोर पुराव्यासह निवडणूक आयोगावर हल्लाबोल केला. महाविकास आघाडीसह मनसे पक्षाने निवडणूक आयोगासमोर काही मतचोरीचे पुरावे सादर केले होते.

याचमुळे राज्यात विरोधकांकडून मतदार यादी स्वच्छ करूनच निवडणुका घेण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र याला न जुमानता नगरपंचायत आणि नगरपरिषदेच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत. यावरून आता काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR