Homeलातूर‘नीट’ची तयारी करणा-या विद्यार्थिनीची आत्महत्या

‘नीट’ची तयारी करणा-या विद्यार्थिनीची आत्महत्या

लातूर : प्रतिनिधी
वैद्यकीय शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या नीट परीक्षेची तयारी करण्यासाठी लातूरमधील सुतमील भागातील महालक्ष्मी  मुलींच्या खासगी वसतिगृहात राहणा-या एका १७ वर्षीय विद्यार्थिनीने स्वत:च्या खोलीतच गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (दि. २८) रात्री १०:३० वाजेच्या सुमारास उघडकीस आली. आत्महत्या मागचे कारण अद्याप समजूशकले नसले तरी या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून या घटनेचा अधिक तपासपोलीसांकडून केला जात आहे.
सानवी उमेशकुमार नारागुडे (वय १७ रा. सोनखेड ता. अहमदपूर जि. लातूर) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. शहराच्या ट्युशन एरिया भागात सुतमील रोडवरील महालक्ष्मी मुलींच्या खाजगी वसतिगृहात राहून सानवी ही नीट परीक्षेची तयारी करीत होती. शनिवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास तिने राहत असलेली खोली बंद केली. अनेकवेळा आवाज देऊनही तिने दार उघडले नाही. मेसची जेवणाची वेळ झाल्याने शेजारच्या खोलीतील मुलींनीही तिला आवाज दिला आणि दार ठोठावले. परंतु, आतून काहीही प्रतिसाद न आल्याने मुलींनी वसतिगृह चालकास कल्पना दिली. वसतिगृह चालकांनी नातेवाईकांसह शिवाजीनगर वाजेच्या सुमारास शिवाजीनगर पोलीस पोलिसांना कळवले. रात्री १०. ३० ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे यांच्यासह त्यांचा चमू वसतिगृहात दाखल होऊन लटकलेला सानवीचा मृतदेह खाली काढला. रात्री उशिरा मृतदेह शासकीय रुग्णालयात हलवला.
डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून सानवी हिने नेमकी आत्महत्या का केली याचे कारण मात्र समजू शकले नाही. सदरील घटनेचा अधिक तपास पोलीसांकडून केला जात आहे. तर घटनेनंतर पालकांनी आपल्या मुलींना या सदरील वस्तीगृहातून घरी घेऊन गेल्याचे समजते.
घटनेपूर्वी रोजच्या प्रमाणे कुटूंबीयांना फोन
या संदर्भात सानवीचे वडील उमेशकुमार नारागुडे यांच्याशी संर्पक साधून विचारपूस केली असता त्यांनी सानवीने रोजच्या प्रमाणे क्लासेसवरून आल्यावर दुपारी २.३८ मिनीटाला मला फोन केला. ती रोजच्या प्रमाणे बोलली त्यानंतर तीने आईला व बहीणीला फोन केला तिचे रोजच्या प्रमाणेच बोलत होती पण तीने आत्महत्या का केले हे समजत नाही असे सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR