लातूर : प्रतिनिधी
येथील स्टार्क क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी नीट परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. नीट परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. नीट परीक्षेत सारंग गावडे या विद्यार्थ्याने ७२० पैकी ६३० गुण मिळवून आपली गुणवत्ता सिद्ध केली तसेच जे. ई. ई. सारख्या परीक्षेत देखील ९९.१४ पर्सेंटाइल घेत आय. आय. टी. हैद्राबाद येथे प्रवेशाची संधी निर्माण केली.
अशाच प्रकारे, उदय शिंदे ६२३२, समृध्दी भागेपल्ले ६२२, समर्थ साठे ६०४, राज गरड ५९८, अक्षय मडके ५९८, राजकुमार साळुंखे ५८६, तांजिल अत्तार ५७७, शुभम पिसे ५६९, वैष्णवी भिसे ५६८ या विद्यार्थांनी देखील अनुक्रमे आपली गुणवत्ता सिद्ध केली. या प्रसंगी स्टार्क क्लासेसचे अध्यक्ष इसरार सगरे आणि मॅनेजिंग डायरेक्टर श्रीगणेश शिंदे यांनी विद्यार्थांचा सत्कार केला आणि पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या.
















