‘नीट’ परीक्षेसाठी पोलिसांकडून तगडा बंदोबस्त

लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्ह्यातून २० हजार ८०१ विद्यार्थी नीट परीक्षेला सामोरे जाणार आहेत. त्यासाठी लातूर जिल्ह्यात ५१ केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे. एकाच सत्रात आज ४ मे रोजी दुपारी  होणा-या या परीक्षेसाठी केंद्रावर आधीच बायोमेट्रिक हजेरीसाठी पोहोचावे लागणार आहे. दरम्यान, सदरची परीक्षा निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाने  जय्यत तयारी केली असून, परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत.
राष्ट्रीय परीक्षा एजन्सीमार्फत नीट-२०२५ ही परीक्षा आज दुपारी २ ते ५ लातूर जिल्ह्यातील विविध ५१ उपकेंद्रांवर घेण्यात येणार आहे. प्रत्येक परीक्षा केंद्रावर एक पोलीस अधिकारी व इतर पोलिस अमलदारां चा बंदोबस्त देण्यात आला आहे. परीक्षा केंद्राच्या परिसरात मोठ्या प्रमाणात परीक्षार्थी येणार असून परीक्षा कालावधीत परीक्षा केंद्रांवर व परिसरात गर्दीमुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता लातूर पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सदर बंदोबस्त करिता लातूर जिल्ह्यातील पाच उपविभागीय पोलीस अधिकारी, ६० पोलीस अधिकारी, ३९१ पोलीस अंमलदार, तर ३०० होमगार्ड यांची तैनाती करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी आज सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत परीक्षा केंद्रांच्या १०० मीटरच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. त्या अनुषंगाने परीक्षार्थी विद्यार्थ्यासोबत येणा-या पालकांनी प्रशासनाने घालून दिलेल्या नियम व अटीचे पालन करावे. विनाकारण गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी. असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात येत आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Parbhani|मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवशी पर्यावरणाचा ‘देववन-घनवन’ संकल्प
02:03
Video thumbnail
Amit Deshmukh|भारतात आता लोकशाही फक्त नावालाच!’ आ.अमित देशमुखांचा भाजपवर पलटवार
01:56
Video thumbnail
Ajitdada Pawar Jayanti|जयंतीदिनीही एकच सवाल... अजितदादांच्या मृत्यूमागचं गूढ कधी उकलणार?
01:19
Video thumbnail
Nanded|नरसीत घराला आग दीड लाख रकमेसह अडीच लाखाचे साहित्य जळून खाक
00:50
Video thumbnail
Latur|धक्कादायक!चाकुर पंचायत समिती कार्यालयासमोर शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न
04:28
Video thumbnail
Ajitdada Pawar Jayanti|दादांच्या आठवणींना उजाळा; सुनेत्रावहिनी पवार आणि जय पवार भावूक
00:40
Video thumbnail
Latur|भिंतींवर पिचकाऱ्या, दुर्गंधी अन् घाण; लातूरच्या प्रशासकीय इमारतीचा श्वास कोंडला
03:17
Video thumbnail
Latur|पूर्णा येथे मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त महा रक्तदान शिबिर
01:18
Video thumbnail
Parbhani|परभणीतील लक्ष्मी नगरात चारचाकीतून गाईची चोरी;घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
02:59
Video thumbnail
Latur|10 वर्षे विना वेतन सेवा; तीन शिक्षकांचे 24 दिवसांपासून उपोषण
03:16
Video thumbnail
Latur|दिल्लीतील लाठीचार्जचे पडसाद उदगीरमध्ये; बहुजन विकास अभियान रस्त्यावर
02:32
Video thumbnail
Latur|स्व. अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त आठवडाभर सर्वरोग निदान शिबिर
02:32
Video thumbnail
Latur|FDA च्या कारवाईला न जुमानता सील तोडली; बेकरी मालकावर गुन्हा!
02:07
Video thumbnail
Latur|टँकरने पाणी विकत घेऊन पिके जगवण्याची वेळ; बळीराजावर दुहेरी संकट
04:55
Video thumbnail
ट्रकच्या जोरदार धडकेत व्यक्ती गंभीर जखमी; सिग्नल व्यवस्था बंद असल्याने नागरिकांचा संताप
01:07

Latest news