नीट पेपरफुटीचा मास्टरमाईंड पी. व्ही. कुलकर्णीला मोठा धक्का

बीड : प्रतिनिधी
नीट पेपरफुटी प्रकरणामुळे देशभरात तर खळबळ उडालीच पण लाखो विद्यार्थ्यांची मेहनत, त्यांच्या स्वप्नांचा चुराडा झाला. याप्रकरणाचा तपास सुरू असून सीबीआयच्या तपासात अनेक धागेदोरे समोर येत आहेत. याच पेपरफुटी प्रकरणातील मुख्य सूत्रधार अर्थात मास्टरमाईंड पी. व्ही. कुलकर्णी याला सीबीआयने पुण्यातून अटक केली होती. नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या अतिशय गोपनीय अशा प्रश्नपत्रिका तयार करणा-या समितीशी कुलकर्णी हा संबंधित होता, अशी माहिती समोर आली. त्याच्या अटकेने प्रचंड खळबळ माजली.

आता याच पी. व्ही. कुलकर्णीला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. सध्या तुरुंगाच्या गजाआड असलेल्या पी. व्ही. कुलकर्णी याचे बीड शहरातील शाहूनगर भागात इमारतीचे बांधकाम सुरू आहे. मात्र त्याचे बांधकाम विनापरवाना असल्याचे उघड झाले असून आता त्यावर तोडक कारवाई होणार आहे. नगर परिषद मुख्य कार्यकारी अधिका-यांनी ही माहिती दिली आहे.

बीड शहरामध्ये शाहूनगर भागात एक अनधिकृत बांधकाम, विनापरवानगी बांधकाम सुरू आहे. आणि ते नीट पेपरफुटी प्रकरणातील मुख्य सूत्रधार पी. व्ही. कुलकर्णी यांच्या इमारतीचे बांधकाम आहे. मात्र यासंदर्भात तक्रार प्राप्त झाल्यानंतर नगर परिषदेच्या नगररचना कार्यालय आणि मालमत्ता कर विभागाने पाहणी केली तसेच चौकशीही करण्यात आली.

तेव्हा त्या ठिकाणी गंभीर त्रुटी आणि अनियमितता आढळून आली आहे. त्या बांधकामाची परवानगीची संचिका आम्ही तपासली, मात्र कुलकर्णी याच्या बांधकामासाठी कुठल्याही प्रकारची परवानगी घेण्यात आलेली नाही. तसेच चारही बाजूने नियमानुसार सोडल्या जाणा-या जागेतही बांधकाम करण्यात आले आहे. यामुळे या बांधकामाशी संबंधित सर्व होल्डर्सना नोटिसा बजावून पुढील कारवाई केली जाणार आहे. तसेच तोडक कारवाई देखील केली जाणार आहे, अशी माहिती नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश फडसे यांनी दिली आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|महेश देशमुख इतिहास रचतील;माजी मंत्री आमदार अमित देशमुखांचा दावा
03:49
Video thumbnail
जिंतूर-परभणी महामार्गावर भीषण अपघात; आजी, आजोबांसह १२ वर्षांचा नातू जागीच ठार
01:53
Video thumbnail
Latur|माजी तंटामुक्ती अध्यक्षाला लातूर ग्रामीणच्या आमदारांच्या लोकांनी दिल्या धमक्या..
11:06
Video thumbnail
जळकोट शहर व तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी; उकाड्यापासून दिलासा, मात्र शेतकरी चिंतेत!
01:24
Video thumbnail
RCC CLASSES PROTEST|RCC क्लासेस बंद करण्याच्या मागणीसाठी लातुरात मोर्चा...
04:21
Video thumbnail
Nanded|नांदेडमध्ये पेट्रोल पंप परिसरात दुर्दैवी अपघात; ३वर्षीय चिमुकल्याचा चारचाकीखाली सापडून मृत्यू
00:52
Video thumbnail
Nanded|लोह्यात धोंडे जेवणाच्या कार्यक्रमातील नृत्य सादरीकरणाचे व्हिडिओ व्हायरल...
01:46
Video thumbnail
भारताला अंदमानच्या समुद्रात सापडला नैसर्गिक वायूचा मोठा खजिना; देशाचे नशीब बदलणार!
00:39
Video thumbnail
Latur|लातूर कृषी महाविद्यालयात दुर्मिळ वनौषधी बीज बँकेचे उद्घाटन; ५०० हून अधिक वनस्पतींचे संवर्धन!
03:01
Video thumbnail
Latur|लातूरचे कृषी महाविद्यालय बनले ऑक्सिजन हब;महाविद्यालय परिसरात तब्बल २ लाख वृक्षांचे संवर्धन
03:25
Video thumbnail
Latur|आर्ट ऑफ लिव्हिंगचा साडेतीन लाख वृक्षलागवडीचा संकल्प; विद्यार्थ्यांच्या हस्ते मोहिमेचा शुभारंभ!
01:41
Video thumbnail
Latur|घरात घुसलेल्या पाण्याने संसार उद्ध्वस्त;महामार्ग विभागाच्या निष्काळजीपणाचा आरोप
01:28
Video thumbnail
Latur|लातुरात १० हजार झाडांचा १० वा वाढदिवस; जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा!
04:33
Video thumbnail
Nanded|उमेदवारी बदलल्यानंतर सुमठाणकरांची सोशल मीडियावर नाराजी?
01:00
Video thumbnail
'विप्रो'च्या माजी महिला अधिकाऱ्याचा इस्लाम स्वीकारण्यासाठी छळ केल्याचा आरोप
01:30

Latest news