नवी दिल्ली : नॅशलन टेस्टींग एजन्सीने मेडिकलसाठीच्या घेतलेल्या नीट यूजी २०२५ चा रिझल्ट आज जाहीर केला आहे. परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल एनटीएच्या वेबसाईट neet.nta.nic.in वर जाऊन पाहाता येणार आहे.
नीट युजी अंतिम आन्सर जारी केले आहेत. या वेळेच्या यादीत राजस्थान, दिल्ली आणि महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा दबदबा आहे. राजस्थानचा महेश कुमार पहिला, मध्य प्रदेशचा उत्कर्ष अवधीया दुसरा तर महाराष्ट्रातील कृषांग जोशी याचा तिसरा क्रमांक आला आहे. सर्व टॉपर जनरल कॅटेगरीतील असून केवळ टॉपर लिस्ट टॉप १० विद्यार्थ्यांमध्ये केवल एक विद्यार्थीनीला स्थान मिळाले आहे.
नॅशनल टेस्टींग एजन्सीने नीट यूजी २०२५ चा रिझल्ट आज अधिकृतपणे जाहीर केला आहे. परीक्षेत सामील उमेदवारांना त्याचे गुण वेबसाईटवर पाहायला मिळत आहेत. एनटीएच्या वेबसाईट neet.nta.nic.in वर हे गुण पाहायला मिळत आहे. पहिल्या रँकवर राजस्थानचे महेश कुमार आले आहेत तर मध्य प्रदेशचे उत्कर्ष अवधिया दूसरे आणि महाराष्ट्रातील कृषांग जोशी तिस-या स्थानावर आहेत. दिल्लीच्या अविका अग्रवाल हीने टॉप ५ मध्ये स्थान मिळवून मुलींमध्ये सर्वोच्च स्थान मिळवले आहे.