जळकोट : प्रतिनिधी
जळकोट तालुक्यातील वांजरवाडा परिसरामधील दहा ते बारा गावांमध्ये दि १६ ऑगस्ट रोजी ढगफुटी झाली होती त्यामुळे शेतक-यांंच्या शेतीमधील पिकांचे प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान झाले. खासदार डॉ. शिवाजीराव काळगे यांनी दि.१८ ऑगस्ट रोजी तालुक्यातील वांजरवाडा परिसरातील होकर्णा, वडगाव, वांजरवाडा, गावांना भेटी देऊन अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी त्यांनी कृषी अधिका-यांना सर्व शेतक-यांच्या पिकांचे पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या .
यावेळी अतिवृष्टीग्रस्त शेतक-यांनी नुकसानीच्या अनुषंगाने आपली कैफियत खासदार शिवाजीराव काळगे यांच्याकडे केली. याप्रसंगी खासदारांनी शेतक-यांंना वा-यावर सोडणार नाही. शासन दरबारी आपला प्रश्न लावून धरला जाईल. नुकसानग्रस्त शेतक-याना मदत मिळेपर्यंत पाठपुरावा सुरूच ठेवणार असल्याचे खासदार शिवाजीराव काळगे यांनी उपस्थित शेतक-यांना आश्वासन दिले . वांजरवाडा परिसरातील शेतक-यांचे ढगफुटीमुळे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतक-यांचे कधीच न भरून निघणारे नुकसान झाले असून शेतक-यांना आर्थिक मदत मिळावी यासाठी राज्य शासन तसेच केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिली तसेच अधिका-यांनी तातडीने पंचनामे करून त्याचा अहवाल प्रशासनाकडे पाठवावा अशा सूचना त्यांनी दिल्या.
याप्रसंगी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मन्मथप्पा किडे, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष शीलाताई पाटील, प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीस उषाताई कांबळे, काँग्रेसचे नेते बाबुराव जाधव, बँकेचे संचालक पांडे, सोशल मीडिया काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रवीण सूर्यवंशी, तालुका कृषी अधिकारी आकाश पवार, महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष पांचाळ, बाजार समितीचे माजी उपसभापती दत्ता पवार, अल्पसंख्यांक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नूर पठाण, माजी तालुकाध्यक्ष मेहताब बेग, काँग्रेसचे शहराध्यक्ष महेश धुळशेट्टे, माजी उपसरपंच राजू कदम, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पाटील, मागासवर्गीय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संग्राम कांबळे, काँग्रेसचे कार्यकर्ते लक्ष्मण तगडमपले, सुधाकर सोनकांबळे, संग्राम मरेवाड, सरपंच मुकुंद पाटील, सरपंच अविनाश नंदवार, निलेश नाईक, काँग्रेसचे कार्यकर्ते प्रमोद दाडगे, अक्षय बडगिरे, बालाजी शिवशेट्टे, वाघमारे, शिवनगे, केरबा सावकार, शेतकरी वसंत मरसोने, बालाजी पाटील , यांच्यासह अनेक कार्यकर्ते, शेतकरी उपस्थित होते.