23.4 C
Latur
Sunday, March 8, 2026
Homeक्रीडान्यूझीलंडची फायनलमध्ये धडक; फिन एलनचे ३३ चेंडूत विक्रमी शतक

न्यूझीलंडची फायनलमध्ये धडक; फिन एलनचे ३३ चेंडूत विक्रमी शतक

आफ्रिका पुन्हा चोकर्स

कोलकाता : न्यूझीलंड संघाने स्पर्धेत अजिंक्य राहिलेल्या दक्षिण आफ्रिका संघावर एकतर्फी विजय मिळवला असून यासह किवी संघाने अंतिम फेरीत धडक मारली आहे. न्यूझीलंड संघाने द. आफ्रिकेवर ९ विकेट्स आणि ४८ चेंडू राखून विजय मिळवला. संघाचे सलामीवीर फिन एलन व टीम सेफर्ट संघाच्या विजयाचा मार्ग तयार करून दिला. फिन एलनने अखेरच्या चेंडूवर वादळी शतक झळकावत संघाचा विजय निश्चित केला.

फिन अ‍ॅलनची विक्रमी सेंच्युरी आणि टिम सिफर्टच्या कडक अर्धशतकाच्या जोरावर कोलकात्यातील ऐतिहासिक ईडन गार्डन्सच्या मैदानावर गत उपविजेत्या दक्षिण आफ्रिकेला एकतर्फी धूळ चारत न्यूझीलंडने दिमाखात फायनलमध्ये धडक मारली. दक्षिण आफ्रिकेने २० षटकांत ८ विकेट गमावून १६९ धावा केल्या. न्यूझीलंडने १७० धावांचे लक्ष्य एका विकेट गमावून १२.५ षटकांत पूर्ण केले. फिन अ‍ॅलनने ३३ चेंडूंत १०० धावांची नाबाद खेळी केली. त्याने टी-२० विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वात जलद शतक ठोकले.

यंदाच्या टी-२० वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिकेचा संघ अपराजित राहून सेमीफायनलपर्यंत पोहोचला होता. दुसरीकडे न्यूझीलंडचा संघ ‘जर-तर’च्या समीकरणात अडकला होता; मात्र सरस धावगतीच्या जोरावर त्यांनी उपांत्य फेरी गाठली. विशेष म्हणजे, याच स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाच वेळा पराभव पत्करलेल्या न्यूझीलंडने यावेळी हिशेब चुकता करत दणदणीत विजय मिळवला. आता न्यूझीलंडचा संघ दुस-यांदा टी-२० वर्ल्ड कपची फायनल खेळताना दिसणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR