लातूर : प्रतिनिधी
ऐकू किंवा बोलता येत नसले तरी आपल्या प्रतिभेच्या जोरावर प्रत्येकजण यशस्वी होऊ शकतो. दिव्यांग विद्यार्थ्यांनी न्यूनगंड न बाळगता आत्मविश्वासाने पुढे जावे असे आवाहन प्रा. डॉे. संदीपान जगदाळे यांनी केले. रोटरी क्लब लातूरच्या वतीने सौ. सुशिलादेवी देशमुख निवासी मूकबधीर विद्यालय, सिग्नल कॅम्प, लातूर येथील विद्यार्थीनींसाठी ईद मिलन कार्यक्रमाचे आयोजन गुरूवारी सायंकाळी करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी रोटरी क्लब लातूरचे अध्यक्ष जकीखान कायमखानी होते. त्यांच्या पुढाकारातूनच हा ईद स्नेह मिलन कार्यक्रम उत्साहात पार पडला. मंचावर प्रमुख पाहुणे जयसिंगराव देशमुख, धनंजयराव देशमुख हे होते. यावेळी विद्यार्थिनींसोबत स्नेहसंवाद साधत फेलोशिपचा आनंद घेतला गेला. तसेच संस्थेतील महिला कर्मचा-यांना साड्या देऊन त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमादरम्यान चित्रकला स्पर्धेत यश मिळवलेल्या मूक-बधीर विद्यार्थिनींना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. सूत्रसंचालन बंकट पवार यांनी केले. आभारप्रदर्शन बाबुराव सोमवंशी यांनी केले. या प्रसंगी रोटरीचे सचिव विश्वनाथ निगुडगे, प्रोजेक्ट चेअरमन बाबुराव सोमवंशी, रामप्रसाद राठी, उत्तरेश्वर हेरकर, विलास जिल्हावर, राजकुमार गिरवलकर महेंद्र जोशी, नरेश कोरे, सुधाकर कोटगिरे, नानिक जोधवानी यांच्यासह प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थिती होते.

