16.8 C
Latur
Saturday, December 6, 2025
Homeमहाराष्ट्रपंकजा मुंडे यांच्या पीएच्या पत्नीची आत्महत्या 

पंकजा मुंडे यांच्या पीएच्या पत्नीची आत्महत्या 

मुंबई : प्रतिनिधी
भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आणि राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांच्या पत्नीने आत्महत्या केल्याची बातमी समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवार, २३ नोव्हेंबर रोजी रात्री अनंत गर्जे यांच्या पत्नीने आत्महत्या केली असल्याची माहिती मिळत आहे. अनंत गर्जे यांचे याच वर्षात लग्न झाले होते. लग्नानंतर अवघ्या काही महिन्यांतच पत्नीने आत्महत्या केली आहे. दरम्यान, या आत्महत्येनंतर मुलीच्या घरच्यांनी ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा दावा केला आहे. तसेच या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करण्याची मागणी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार याच वर्षी ७ फेब्रुवारीला अनंत गर्जे यांचा विवाह गौरी यांच्यासोबत झाला होता. कौटुंबिक वादातून ही आत्महत्या झाल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी वरळी पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी केईएम रुग्णालयात पाठवला आहे. वरळीतील बीडीडी येथे ते राहात होते, गौरी या डॉक्टर असून केईएम रुग्णालय डेंटिस्ट विभागात कार्यरत होत्या. दरम्यान, या प्रकरणात तपास केला जात आहे. या घटनेनंतर मंत्री पंकजा मुंडे यांनी आपले बीडमधील सर्व कार्यक्रम रद्द केल्याची माहिती मिळत आहे. अनंत गर्जे हे पंकजा मुंडे यांच्याकडे अनेक वर्षांपासून स्वीय सहाय्यक म्हणून काम पाहतात.

आत्महत्या नसून हत्या, कुटुंबियांचा आरोप
शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर नक्की काय घडले हे स्पष्ट होईल. सध्या तर याबाबत मंत्री पंकजा मुंडे यांनी कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया दिली नाही. या प्रकरणावर पंकजा मुंडे नेमके काय बोलणार याकडे देखील सर्वांचे लक्ष आहे. या आत्महत्येनंतर आता उलटसुलट प्रश्न निर्माण होत आहेत. कुटुंबिय देखील मोठ्या संख्येने वरळी पोलिस ठाण्यात पोहोचले असून ही आत्महत्या नसून हत्या आहे असा गंभीर आरोप करत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR