पंजाबमध्ये भीषण अपघात; ९ ठार, १५ जखमी

फिरोजपूर : पंजाबमधील फाजिल्का-फिरोजपूर रस्त्यावर शनिवारी (६ जून) सकाळी पिकअप आणि ट्रकची भीषण टक्कर झाली. या अपघातात नऊ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून १५जण जखमी झाले आहेत. जखमींना खाजगी आणि सरकारी रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. तर गंभीर जखमींना फरिदकोटला हलवण्यात आलं आहे. या अपघातामुळं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

अस्थी विसर्जनाला जाताना काळाचा घाला : मिळालेल्या माहितीनुसार, जलालाबाद येथील एका कुटुंबातील सदस्य त्यांच्या वृद्ध महिलेच्या अस्थींचं विसर्जन करण्यासाठी डेरा बियासला जात होते. पिकअपमध्ये महिला, पुरुष आणि मुलांसह जवळपास २५ जण प्रवास करत होते. या अपघातात पाच महिला, तीन पुरुष आणि एका मुलाचा मृत्यू झाला, तर १५ जण जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथकं तत्काळ घटनास्थळी दाखल झाली. मृतदेह शवविच्छेदनासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले आहेत.

संपूर्ण परिसरात शोककळा
एकाच कुटुंबातील अनेक सदस्यांच्या मृत्यूमुळं संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. फिरोजपूर-फाजिल्का राष्ट्रीय महामार्गावरील या भीषण अपघातानं एका सुखी कुटुंबाचा आनंद क्षणभर हिरावून घेतला. कुटुंबीयांनी सांगितलं की, ते पहाटे ४ वाजता घरातून निघाले होते आणि डेरा बियासकडे जात होते. एका धार्मिक यात्रेचा इतका दु:खद अंत होईल, याची कोणी कल्पनाही केली नव्हती.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये कलावंतांचा अनोखा संघर्ष; सूर आणि तालातून न्यायाची हाक
03:09
Video thumbnail
Big Breaking : पिस्तुल्या महाराजाच्या दीड कोटींच्या बंगल्यावर जप्तीची तयारी!
02:12
Video thumbnail
Latur Protest|सोनम वांगचूक प्रकरणाचे लातूरमध्ये पडसाद; गांधी चौकात घोषणाबाजी
06:07
Video thumbnail
Parbhani|राहुल पाटील यांना सईद खानांचे थेट आव्हान; परभणीचे राजकारण तापले
03:39
Video thumbnail
EXCLUSIVE : पाऊस गायब... पिक वाचवण्यासाठी शेतकऱ्याचा जीवघेणा संघर्ष!
02:20
Video thumbnail
उजनीतून सोडलेले पाणी सीना नदीत; लाखो एकर शेतीला मिळणार संजीवनी
00:58
Video thumbnail
पालईगुडा–कुपटी राज्य मार्गावरील पूलांचे काम रखडले; मुसळधार पावसात मार्ग बंद पडण्याची भीती
00:23
Video thumbnail
Nanded|दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात; चिखलीकरांची स्पष्ट भूमिका
01:37
Video thumbnail
Latur Murder|खून झाला... तरी बारवर कारवाई नाही? नेमकं संरक्षण कुणाचं?
02:38
Video thumbnail
Big Breaking : नीट पेपरफुटी प्रकरणात CBI पुन्हा लातुरात; तपासाला वेग!
03:15
Video thumbnail
Latur|पावसासाठी वडवळ नागनाथमध्ये शेकडोंचे नवनाथ पारायण
05:12
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये पावसाअभावी खरीप हंगाम संकटात
02:56
Video thumbnail
Latur|रेणापूरमधील बेकरीवर FDA चा छापा; परवाना जागेवरच रद्द
00:56
Video thumbnail
Solapur|धक्कादायक! सोलापूरच्या जलवाहिनीला तडा; लाखो लिटर पाणी वाया
01:04
Video thumbnail
Latur|जन्मभूमीतून खासदारांचा जनता दरबार; नागरिकांच्या समस्या थेट ऐकल्या
04:18

Latest news