23.5 C
Latur
Sunday, October 13, 2024
Homeमनोरंजनपंडित जसराज यांच्या पत्नी मधुरा यांचे निधन

पंडित जसराज यांच्या पत्नी मधुरा यांचे निधन

मुंबई : प्रसिद्ध शास्त्रीय गायक पंडित जसराज यांच्या पत्नी आणि व्ही. शांताराम यांच्या कन्या मधुरा जसराज यांनी आज सकाळी त्यांच्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला, अशी माहिती त्यांची मुलगी दुर्गा जसराज यांनी दिली आहे. मधुरा अनेक दिवसांपासून आजारी होत्या अशी माहिती देखील समोर आली असून, वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. मधुरा यांच्या निधनामुळे मनोरंजन आणि संगीत क्षेत्रामधून शोक व्यक्त केला जात आहे.

मधुरा आणि पंडित जसराज यांचा विवाह १९६२ मध्ये झाला होता. त्यांना दुर्गा जसराज आणि शारंग देव अशी दोन मुले आहेत. लेखक, चित्रपट निर्माते आणि कोरिओग्राफर म्हणून नावलैकिक मिळवलेल्या मधुरा यांच्या पार्थिवावर ओशिवरा स्मशानभूमीत ४ ते साडेचार दरम्यान अन्त्यसंस्कार केले जाणार आहेत, अशी माहिती त्यांचे प्रवक्ते प्रीतम शर्मा यांनी दिली.

दरम्यान, याआधी ऑगस्ट २०२० मध्ये पंडित जसराज यांचे वयाच्या ९० व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. जसराज यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. जसराज आणि मधुरा पंडित यांची मुलगी दुर्गा संगीतकार आणि अभिनेत्री आहे. तर मुलगा शारंग देव संगीत दिग्दर्शक आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR