लातूर : प्रतिनिधी
आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर विठ्ठलाच्या दर्शनासाठी जाणा-या गोर-गरीब भावीकांच्या सोयीसाठी प्रतिवर्षाप्रमाणे मोफत पंढरपूर यात्रा वारकरी सेवा याही वर्षी येथील सत्संग प्रतिष्ठान लातूर यांच्या वतीने मोफत बस सेवेअंतर्गत ३१ बसेसची सोय करण्यात आली आहे. हा उपक्रम प्रतिष्ठान तर्फे मागील २४ वर्षांपासून राबविला जात आहे.
पंढरपूर यात्रेसाठी शनिवार दि. ५ जुलै रोजी सकाळी १० वाजता बसस्थानक क्र. २, यशोदा टॉकिजसमोर, अंबाजोगाई रोड, लातूर येथून मोफत बस सेवा उपलब्ध करण्यात आली आहे. इच्छुक भाविकांना ४ जुलैपर्यंत आपल्या ओळखपत्रासह खालील ठिकाणी नांव नोंदणी करुन आपले पास घ्यावेत, असे आवाहन श्री सत्संग प्रतिष्ठान संयोजन समिती, लातूर यांच्या वतीने करण्यात आले आहे. नाव नोंदणीसाठी खालील पत्यावर संपर्क साधावा.
लातूर अर्बन को-ऑप बँक लि. लातूर जिल्ह्यातील सर्व शाखा, श्री अष्टविनायक मंदिर ट्युशन एरिया लातूर, श्री दत्ता लोखंडे सुभाष चौक लातूर, सुरेश मालु मार्केट यार्ड लातूर, अशोक गोविंदपूरकर रमा बिग सिनेमा लातूर, भंडारी किराणा मोती नगर लातूर, ओमप्रकाश मुंदडा मार्केट यार्ड लातूर, बालाजी बारबोले ऑटो पॉईंट हनुमान चौक लातूर, सोनी एजन्सीज्, छत्रपती शिवाजी महाराज चौक बस डेपो समोर लातूर, रमनजी पारीख साईबाबा ऑटोमोबाईल्स् ५ नं. चौक लातूर, नाना लोखंडे आखरवाई आदी ठिकाणी नांव नोंदणी सुरु करण्यात आली आहे.
जास्तीत जास्त भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री सत्संग प्रतिष्ठानचे अध्यक्ष गोविंद पारीक, सचिव चंदुसेठ लड्डा, रमेश भुतडा, शाम मुंदडा, केतन हलवाई, लक्ष्मीकांत बियाणी, रमेश राठी, मधुसूदन भूतडा, अशोक गोविंदपूरकर, दिलीप माने, लक्ष्मणराव मोरे, निलेश ठक्कर, शैलेश लाहोटी, प्रकाश कासट, रमेश बियाणी, मकरंद सावे, सुरेश मालु, लक्ष्मीकांत सोमाणी, अशोक अग्रवाल, इर््श्वर बाहेती, अशोक भोसले, रामानूज रांदड, जुगलकिशोर झंवर, अॅड. बळवंत जाधव, राजा मणियार, छोटू गडकरी, नंदकिशोर मूंत्री व सर्वश्री सत्संग प्रतिष्ठानच्या पदाधिकारी यांनी केले आहे.