पंढरीत भक्तीसागर उसळला

आषाढीनिमित्त १५ लाखांवर भाविक दाखल, चंद्रभागेत पवित्र स्रानासाठी गर्दी
अपराजित सर्वगोड/पंढरपूर
आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त पंढरपूरनगरीत अभूतपूर्व भक्तिसागर उसळला असून, १५ लाखांहून अधिक भाविकांनी श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी पंढरीत दाखल झाले आहेत.

टाळ, मृदंगाच्या गजराने आणि ज्ञानोबा-तुकारामच्या अखंड जयघोषाने संपूर्ण पंढरपूर दुमदुमून गेले असून चंद्रभागा नदीचा परिसर, मंदिर परिसर आणि शहरातील प्रमुख मार्ग वारकरी व भाविकांनी फुलून गेले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक श्री विठ्ठल व माता रुक्मिणीची पारंपरिक शासकीय महापूजा शनिवारी पहाटे सुमारे २.३० वाजता विधिवत संपन्न होणार आहे.

आषाढी एकादशीनिमित्त शनिवारी पहाटेपासूनच भाविकांनी चंद्रभागा नदीत पवित्र स्रान करून श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. विठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शन, मुखदर्शन आणि शिखर दर्शनासाठी स्वतंत्र रांगांची व्यवस्था करण्यात आली. मुखदर्शनासाठी सुमारे ३२ ते ३४ तासांचा कालावधी लागत असून, चरण दर्शनाच्या रांगेत एक लाखाहून अधिक भाविक तर मुखदर्शनाच्या रांगेत १५ ते २० हजार भाविक उभे आहेत.

आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर शहरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून संवेदनशील ठिकाणी अतिरिक्त पोलीस, राज्य राखीव पोलीस दल, होमगार्ड तसेच सीसीटीव्ही आणि ड्रोनच्या माध्यमातून परिस्थितीवर सतत लक्ष ठेवण्यात येत आहे. जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली मंदिर समिती, नगरपालिका आणि विविध शासकीय विभागांनी गेल्या दोन महिन्यांपासून यात्रेचे नियोजन केले होते. लाखो वारक-यांच्या उपस्थितीत पंढरपूर नगरी भक्ती, श्रद्धा आणि हरिनामाच्या गजराने अक्षरश: दुमदुमून गेली असून, आषाढी एकादशीचा सोहळा उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात सुरू आहे.

व्यापक नियोजन
भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी मंदिर समिती, जिल्हा प्रशासन, नगरपालिका, पोलीस प्रशासन तसेच विविध विभागांनी व्यापक नियोजन केले आहे. दर्शन रांगा, पिण्याचे पाणी, आरोग्य सेवा, आपत्कालीन वैद्यकीय सुविधा, वाहतूक नियंत्रण आणि स्वच्छतेवर विशेष भर देण्यात आला आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
LIVE-लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन
29:29
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! बी. व्ही. काळे रुग्णालयात तपासणी-उपचार मोफत
02:42
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! शिवपुजे हॉस्पिटलमध्ये हृदयरोग तपासणी मोफत
01:05
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आदरांजली;पोदार हॉस्पिटलमध्ये मोफत अस्थीरोग शिबिर
02:13
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुख स्मृतिदिनानिमित्त बरमदे हॉस्पिटलमध्ये सर्व तपासण्या मोफत
02:07
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आरोग्यसेवेतून आदरांजली
02:35
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुखांच्या स्मृतिदिनी बाभळगावात जनसागर!
01:01
Video thumbnail
Latur|हरंगुळ पेटलं! प्रदूषण आणि अवैध धंद्यांविरोधात ग्रामस्थ आक्रमक
03:59
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने अनोखी आदरांजली;लातुरात महाआरोग्य शिबिर
03:52
Video thumbnail
Latur|धक्कादायक! ट्रक-ऑटोच्या धडकेत एकाचा मृत्यू
01:03
Video thumbnail
Latur|माजी सरपंच धनंजय देशमुख यांची मोठी भूमिका; म्हणाले—“परवाना रद्द करण्यासाठी पाठपुरावा करणार
06:26
Video thumbnail
जळकोटच्या आठवडी बाजारात भाजीपाला स्वस्त; खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी
02:02
Video thumbnail
Latur -गवळी समाजाची 15 वर्षांची परंपरा कायम; आषाढ महोत्सवात भक्तांची गर्दी
03:25
Video thumbnail
Purna|आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्णा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम
02:40
Video thumbnail
Latur|वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी संभाजी सेनेचे आंदोलन
03:44

Latest news