Homeराष्ट्रीयपंतप्रधान नरेंद्र मोदींना  मीडियाने मोठे केले

पंतप्रधान नरेंद्र मोदींना  मीडियाने मोठे केले

राहुल गांधी यांचा हल्लाबोल
नवी दिल्ली : वृत्तसंस्था 
पंतप्रधान नरेंद्र मोदींमध्ये दम नाही, मीडियानेच त्यांना मोठे केले, अशी टीका लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी केली. दिल्लीतील ओबीसींच्या भागिदारी न्याय महासंमेलनात ते बोलत होते. राहुल गांधींचा हा व्हिडीओ ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी  या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून शेअर केला आहे.
नरेंद्र मोदी म्हणजे काय मोठी समस्या नाही. मी तुम्हाला सांगत आहे. तुम्ही डोक्यावर बसवले आहे. मीडियावाल्यांनी फुगा बनवला आहे. पूर्वी तर मी भेटलो नव्हतो. आता मी दोन-तीन वेळेस भेटलो आहे. मला आता समजले की, त्यांच्यामध्ये काही नाही. सगळा शो आहे, काही दम नाही. तुम्ही त्यांना भेटले नाहीत, मी भेटलो आहे, असे राहुल गांधी म्हणाले.
राहुल गांधी पुढे म्हणाले, मी २००४ पासून राजकारणात आहे. आता २१ वर्षे झाले आहेत. मी मागे वळून पाहतो आणि आत्मपरीक्षण करतो. मी कुठे योग्य काम केले आणि कुठे कमतरता होती, हे मी पाहातो. त्यावेळी मला दोन-तीन गोष्टी जाणवतात. आम्ही जमीन अधिकरण कायदा केला. मनरेगा योजना आणली. आम्ही ट्रायबल बिलदेखील पास केले. या बाबी मी योग्य केल्या. मात्र, एक गोष्ट मला क्लिअर दिसते. माझ्याकडून एक गोष्ट करायची राहिली ती म्हणजे मी ओबीसी वर्गाचे संरक्षण करु शकलो नाही. मला पश्चाताप होतोय की, तुमच्या इतिहासाबाबत आणि तुमच्या समस्यांबाबत थोडीशी माहिती असती तर मी तेव्हाच जातनिहाय जनगणना केली असती. मी स्टेजवरुन सांगतो. ती माझी चूक होती. मी ती चूक सुधारायला चाललो आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR