23.6 C
Latur
Thursday, June 19, 2025
Homeराष्ट्रीयपंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जी-७ संमेलनाचे निमंत्रण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जी-७ संमेलनाचे निमंत्रण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कॅनडाकडून जी-७ संमेलनाचे आमंत्रण देण्यात आले आहे. कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी फोन करुन मोदींना बैठकीचे आमंत्रण दिले. त्यामुळे आता कॅनडात होणा-या या संमेलनाला पंतप्रधान मोदी उपस्थित राहणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कॅनडाचे नवनिर्वाचित पंतप्रधान मार्क जे. कार्नी यांच्यात फोनवरून संभाषण झाले. यावेळी पंतप्रधान मोदींनी कार्नी यांचे निवडणुकीतील विजयाबद्दल अभिनंदन केले. यावेळी कार्नी यांनी पंतप्रधान मोदींना या महिन्याच्या अखेरीस कॅनडातील कनानास्किस येथे होणा-या जी-७ शिखर परिषदेसाठी आमंत्रित केले. यावर मोदींनी ट्विटरवरून ‘कॅनडाचे पंतप्रधान मार्क जे कार्नी यांच्याशी फोनवरून बोलणे झाले. निवडणुकीत झालेल्या विजयाबद्दल मी त्यांचे अभिनंदन केले आणि या महिन्याच्या अखेरीस कनानास्किस येथे होणा-या जी-७ शिखर परिषदेसाठी मला आमंत्रित केल्याबद्दल त्यांचे आभार असे म्हटले. जिवंत लोकशाही आणि लोकांमधील खोल संबंधांनी जोडलेले भारत आणि कॅनडा परस्पर आदर आणि सामाजिक हितसंबंधांच्या आधारे नवीन उर्जेने एकत्र काम करतील, असा विश्वास व्यक्त केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR