पंतप्रधान मोदींविरोधातील आक्षेपार्ह वक्तव्यानंतर नोएडातील मुलीचा व्हीडीओ व्हायरल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
जंतर-मंतरवरील सीजेपीच्या आंदोलनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात अपशब्द वापरल्या प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या नोएडातील रुचिका सिंह हिने हात जोडून देशाची माफी मागितली आहे. दिल्ली पोलिसांनी चौकशी सुरू केल्यानंतर तिने सोशल मीडियावर व्हीडीओ प्रसिद्ध करत आपण केवळ १५ वर्षांची असून आंदोलनातील इतरांच्या प्रभावाखाली हे वक्तव्य केल्याचा दावा केला आहे.

व्हीडीओमध्ये रुचिका सिंह म्हणाली की, मी माझ्या मैत्रिणीसोबत कनॉट प्लेसला गेले होते. तिथे आंदोलन सुरू होते आणि अनेक गट उपस्थित होते. काहीजण पंतप्रधानांविरोधात अत्यंत अश्लील भाषा वापरत होते. त्यांनी मलाही काहीतरी बोलण्यास सांगितले. त्यांच्या प्रभावाखाली येऊन मीही अनेक चुकीच्या गोष्टी बोलले. मी फक्त १५ वर्षांची आहे.

तिने पुढे सांगितले की, मी जे बोलले ते अक्षम्य आहे. मी अतिशय अश्लील शब्दांचा वापर केला. मात्र, ही माझी पहिली आणि शेवटची चूक आहे. भविष्यात मी अशी चूक पुन्हा करणार नाही. तो व्हीडीओ मी स्वत: पोस्ट केलेला नाही. मी संपूर्ण देशाची माफी मागते. कृपया मला माफ करा.

मात्र, रुचिकाचा अल्पवयीन असल्याचा दावा पोलिसांकडून समोर आलेल्या माहितीसोबत जुळत नसल्याचे सांगितले जात आहे. पोलिस ठाण्याचे एसएचओ अमित खरे यांनी यापूर्वी सांगितले होते की, रुचिका कुटुंबासह फरीदाबाद येथे राहते. तसेच जानेवारी महिन्यात तिने नोएडातील सेक्टर १५० येथील लोटस झिंग सोसायटीमध्ये फ्लॅट खरेदी केला आहे. या सोसायटीतील सुरक्षा रक्षक मेहताब सिंह यांनीही रुचिका अनेक वर्षांपासून आईसोबत येथे राहत असल्याचे आणि जंतर-मंतर प्रकरणानंतर ती अचानक बेपत्ता झाल्याचे सांगितले.

झिरो एफआयआर दिल्ली पोलिसांकडे वर्ग
गाझियाबादमधील वकील स्मृती सिंह यांच्या तक्रारीवरून दाखल करण्यात आलेला झिरो एफआयआर भारतीय न्याय संहिता कलम ३५२ (जाणीवपूर्वक अपमान करून शांततेचा भंग घडविण्याचा प्रयत्न), कलम ३५३(१) (सार्वजनिक उपद्रव) आणि कलम ३५६(१) (मानहानी) अंतर्गत नोंदविण्यात आला आहे. कथित घटना दिल्लीत घडल्यामुळे हा गुन्हा पुढील तपासासाठी दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलकडे वर्ग करण्यात आला आहे. याशिवाय, आक्षेपार्ह मजकूर सोशल मीडियावर प्रसारित झाल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी स्वतंत्र एफआयआरही दाखल केला असून संबंधित व्हीडीओ हटविण्यासाठी ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला नोटीस बजावण्यात आली आहे.

पंतप्रधान मोदींचीही प्रतिक्रिया
या प्रकरणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही प्रतिक्रिया दिली. इन्स्टाग्रामवरील एका व्हीडीओमध्ये त्यांनी स्वत:विरुद्ध आणि त्यांच्या आईविरोधात वापरण्यात आलेली भाषा ही ‘सांस्कृतिक धक्का’ असल्याचे म्हटले. त्यांनी संबंधित तरुणांवर कठोर कारवाई करण्याऐवजी संयम बाळगण्याचे आवाहन केले. ‘या तरुणांना शिक्षा देण्याऐवजी त्यांना समजून घेण्याची गरज आहे. केवळ गुन्हे दाखल करून किंवा न्यायालयीन प्रक्रिया राबवून अशा सामाजिक समस्यांचे निराकरण होणार नाही,’ असे त्यांनी स्पष्ट केले.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur -गवळी समाजाची 15 वर्षांची परंपरा कायम; आषाढ महोत्सवात भक्तांची गर्दी
03:25
Video thumbnail
Purna|आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्णा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम
02:40
Video thumbnail
Latur|वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी संभाजी सेनेचे आंदोलन
03:44
Video thumbnail
Nanded|: 'गुंगी गुडिया' वक्तव्यावरून राष्ट्रवादी आक्रमक; हर्षवर्धन सपकाळांविरोधात जोडे मारो आंदोलन
03:29
Video thumbnail
Latur|जळकोट तालुक्यात जलस्रोत तुडुंब; पाण्याचा प्रश्न मिटला, शिवार हिरवाईने नटले
01:14
Video thumbnail
Solapur| मोहोळमध्ये संजय राऊत यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
01:19
Video thumbnail
Latur|नांदेड–बिदर महामार्गावरील सिमेंट रस्त्याला मोठ्या भेगा; अपघाताचा धोका
00:59
Video thumbnail
Latur|शिवराज पाटील चाकूरकर यांच्या भव्य स्मारकाची तयारी; चार दिवसांत मोठा निर्णय!
03:22
Video thumbnail
Nanded|धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर राकेश टिकैतांचे मोठे वक्तव्य..
01:30
Video thumbnail
Latur|खरीप हंगामावर एल निनोचं सावट; शेतकऱ्यांची नजर आकाशाकडे
02:40
Video thumbnail
Latur|बोगस खत विकणाऱ्यांविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार
04:25
Video thumbnail
Parbhani|परभणी-गंगाखेड महामार्गाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह;202 कोटी खर्च करूनही महामार्गाची दुरवस्था
01:21
Video thumbnail
Nanded|नांदेड हादरलं! दहावीतील विद्यार्थ्याचा वर्गमित्रावर चाकू हल्ला
02:10
Video thumbnail
भूम तालुक्यातील आंबी जयवंतनगर मार्ग बंद;देवगावरोड वरील पूल गेला वाहून,अनेक गावांचा संपर्क तुटला
00:17
Video thumbnail
Nanded|हिमायतनगरमध्ये प्रशासनाचा बुलडोझर; उमर चौक अतिक्रमणमुक्त
01:29

Latest news