Homeलातूरपं. जयतीर्थ मेवुंडी यांचे शास्त्रीय गायन होणार 

पं. जयतीर्थ मेवुंडी यांचे शास्त्रीय गायन होणार 

लातूर : प्रतिनिधी
विकासरत्न, माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या स्मृतिप्रित्यर्थ लातूरमध्ये स्वरविलास संगीत दरबार या अभिजात शास्त्रीय संगीत सभेचे दरवर्षी आयोजन करण्यात येते. यंदा या स्वरविलास संगीत दरबारात किराणा घराण्याचे गायक पं. जयतीर्थ मेवुंडी यांचे गायन दि. १५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५.३० वाजता येथील दयानंद सभागृहात लातूरकर श्रोत्यांना अनुभवायला मिळणार आहे.
लातूरमधील सांस्कृतिक चळवळ कार्यरत ठेवण्यासाठी स्वरविलास संगीत दरबार आयोजित केला जातो. विकासरत्न विलासराव देशमुख हे शास्त्रीय संगीताचे चाहते होते. त्यामुळे त्यांच्या स्मृतप्रित्यर्थ स्वरविलास संगीत दरबारचे आयोजन केले जाते. माजी मंत्री, सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या संकल्पनेतून व शास्त्रीय संगीताच्या प्रचारासाठी कार्यरत असलेल्या येथील आवर्तन प्रतिष्ठानच्या वतीने होणारी ही संगीत सभा दि. १५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५.३० वाजता दयानंद सभागृहात आयोजित करण्यात आली आहे.
गतवर्षी स्वरविलास संगीत दरबारात मेवाती घराण्याचे प्रसिद्ध गायक पं. संजीव अभ्यंकर यांचे गायन झाले होते. यंदा पं. जयतीर्थ मेवुंडी यांचे शास्त्रीय गायन होणार असून त्यांना  युवा तबलावादक महेशराज साळूंके (पुणे), संवादिनी वादक स्वरुप दिवाण (कोल्हापूर) हे साथ करणार आहेत. स्वरविलास संगीत दरबार सर्व रसिकांसाठी विनामुल्य आहे. स्वरविलास संगीत दरबारच्या आयोजनासाठी अवर्तन प्रतिष्ठानचे अध्यक्ष अभय शहा, सचिव डॉ. रविराज पोरे, नियोजन प्रमुख विशाल जाधव, मार्गदर्शक अतुल देऊळगावकर, डॉ. अजित जगताप, डॉ. संदीपान जगदाळे, प्रा. शशिकांत देशमुख, प्रा. हरिसर्वोत्तम जोशी, महेश काकनाळे, केशव जोशी, व्यंकटेश पांचाळ, खंडागळे, शिरीष डावरे, शंभूदेव केंद्रे, हरीराम कुलकर्णी, दिनकर पाटील, काकासाहेब सोनटक्के, दत्ता पाटील, सतीश मिरखलकर, डॉ. भदाडे, हेमंत रामढवे, डॉ. वृषाली देशमुख, डॉ. मंजुषा कुलकर्णी व इतर कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR