26.9 C
Latur
Thursday, January 22, 2026
Homeमहाराष्ट्रपतंग उडवत असताना सहावीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू

पतंग उडवत असताना सहावीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू

धुळे : प्रतिनिधी
काही दिवसांवर मकर संक्रांत आली असून शहरात नागरिक पतंग उडवण्याचा आनंद घेत आहेत. अशातच धुळ्याच्या कापडण्यामध्ये पतंग उडवताना विद्यार्थ्याचा मृत्यू झाला असल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. पतंग उडवत असताना शाळकरी विद्यार्थ्याचा तीन मजली इमारतीवरून पडून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने मृत विद्यार्थ्याच्या कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रक्षित प्रभाकर पाटील असे मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. रक्षित हा इयत्ता सहावीमध्ये शिकत होता. घटनेच्या दिवशी रक्षित शाळेत जायला निघाला होता. यादरम्यान वाटेत त्याला आपले मित्र पतंग उडवत असल्याचे दिसले आणि त्याला पतंग उडवण्याचा मोह अनावर झाला. रक्षित पतंग उडवण्यासाठी इमारतीवर गेला असता त्याचा पाय घसरला. पाय घसरल्याने रक्षित खाली कोसळला आणि त्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR