पदवीधर मतदारसंघामध्ये चुरशीची लढत;  २३ ऑक्टोबर रोजी मतदान

पुणे : प्रतिनिधी
पदवीधर मतदारसंघामध्ये एका जागेसाठी चुरशीची लढत होणार असून शिक्षक मतदारसंघातील एका जागेसाठीची निवडणूक तिरंगी होणार आहे असे निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. येत्या २३ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे.

विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघात भारतीय जनता पक्षाच्या वतीने डॉ. स्मिता जाधव तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाकडून हर्षदा देशमुख-जाधव यांच्यात थेट तर शिक्षक मतदारसंघात भारतीय जनता पक्षाकडून कौस्तुभ गावडे. काँग्रेस पक्षाकडून जयंत आसगावकर आणि राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांचे माजी स्वीय सहायक सचिन सानप हे निवडणुकीच्या रिंगणात असल्याने निवडणूक रंगतदार होईल अशी चिन्हे आहेत. दोन्ही मतदारसंघांतील उमेदवारांच्या माघारीची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे.

विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी पुणे विभागात प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. दोन्ही मतदारसंघांसाठी येत्या २३ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान होणार असून, २७ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. पदवीधर मतदारसंघातून ४७, तर शिक्षक मतदारसंघातून ३० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
पुणे विभागाच्या विभागीय आयुक्त शीतल तेली-उघले यांनी ही माहिती सांगितली. दोन्ही मतदारसंघांचे कार्यक्षेत्र पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या पाच जिल्ह्यांमध्ये आहे. संबंधित जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहत आहेत.
४ लाख ५० हजार मतदार; १,०५१ मतदान केंद्रे
पदवीधर मतदारसंघासाठी एकूण ३ लाख ८८ हजार मतदार असून त्यांच्यासाठी ७४१ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. तर शिक्षक मतदारसंघासाठी ६२ हजार मतदार असून,त्यांच्यासाठी ३१० मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. अशा प्रकारे दोन्ही मतदारसंघांत मिळून सुमारे ४ लाख ५० हजार मतदार १,०५१ मतदान केंद्रांवर मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

पदवीधर मतदारसंघात ४७ उमेदवार
पदवीधर मतदारसंघासाठी एकूण ७५ उमेदवारांनी ८७ नामनिर्देशनपत्रे दाखल केली होती. छाननीनंतर ७० उमेदवारांचे ८१ नामनिर्देशन अर्ज वैध ठरले. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी, ९ ऑक्टोबर रोजी २३ उमेदवारांनी माघार घेतल्यानंतर अंतिमत: ४९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहिले आहेत.

शिक्षक मतदारसंघात ३० उमेदवार
शिक्षक मतदारसंघासाठी एकूण ४९ उमेदवारांनी ६७ नामनिर्देशनपत्रं दाखल केली होती. छाननीनंतर ४८ उमेदवारांचे ६५ नामनिर्देशन अर्ज वैध ठरले. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीनंतर ३० उमेदवार निवडणूक लढवत आहेत.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

सुर्यकांत सरन्यायाधीशांच्या खुर्चीवर बसण्याच्या लायक नाहीत

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सरन्यायाधीश सूर्यकांत आणि...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

पुण्यात उभारणार महाराष्ट्रातील सर्वांत मोठे बसस्थानक; ८२५ कोटींचा पुनर्विकास...

पुणे : पुण्यातील शिवाजीनगर एसटी बसस्थानकाचा लवकरच कायापालट होणार...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur News | ऐन दुष्काळात लाखो लिटर पाणी गटारात; स्वातंत्र्य सैनिक नगरमध्ये जलवाहिनी फुटली
01:53
Video thumbnail
LIVE - आमदार अमित देशमुख यांच्या हस्ते किसना डायमंड आणि गोल्ड ज्वेलरी शॉपच उद्घाटन
00:00
Video thumbnail
Dharmabad News | सर्पदंशाच्या रुग्णाची रुग्णवाहिका रस्त्यात बंद
01:17
Video thumbnail
Latur Bank Election| बाभळगावात शिट्टी वाजवून सहकार पॅनलचा जल्लोष; १९ पैकी १४ जागांवर विजय
00:47
Video thumbnail
Diliprao Deshmukh Reaction | धीरज देशमुख कॅप्टन, विजयाचे श्रेय त्यांना – दिलीपराव देशमुख
04:23
Video thumbnail
Jalkot Accident News | जळकोटमध्ये अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; एकाचा मृत्यू, एक जखमी
01:22
Video thumbnail
Nanded News | आदिवासी महादेव कोळी समाजाचा मोर्चा; घटनात्मक हक्कांसह श्वेतपत्रिकेची मागणी
00:38
Video thumbnail
Nanded News | ऊस उत्पादकांच्या मागण्यांचे निवेदन दिले; बालाजी गाडे यांना ५ कोटींची नोटीस
02:16
Video thumbnail
Journalist First Reaction | पत्रकारांच्या नजरेतून लातूर जिल्हा बँकेचा निकाल
11:49
Video thumbnail
Dhiraj Deshmukh First Reaction| लातूर जिल्हा बँक निवडणुकीत ११ जागांवर विजय; धीरज देशमुख काय म्हणाले?
02:42
Video thumbnail
Election Update|लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक निकाल
04:13
Video thumbnail
Rushikesh Karad|"नीट बोला" आमदार पुत्राला पोलिसांनी झापलं!
00:22
Video thumbnail
Rushikesh Karad|"नीट बोला"आमदार पुत्राला पोलिसांनी झापलं!
01:07
Video thumbnail
Nanded News | पाकिस्तानी क्रीममध्ये 48 हजार पट पारा! फॉरेन्सिक अहवालात धक्कादायक निष्कर्ष
03:02
Video thumbnail
Nanded|शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी आंदोलन
05:43

Latest news