परभणी : शहरातील श्री रेणुका महिला मंडळाच्या वतीने तुकामाई राज्यस्तरीय चतुर्थ महापारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा पारायण सोहळा गुरूवार, दि. ३१ डिसेंबर रोजी श्री रेणुका मंगल कार्यालय, पाथरी रोड परभणी येथे होणार आहे. या महापारायण सोहळ्याची जय्यत तयारी सुरू झाली असून आजपर्यंत ६०० भक्तांनी नाव नोंदणी केली असून भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
उमरखेड संस्थान मठाधिपती प. पु. माधवानंद महाराज येहळेगाव संस्थान यांच्या आर्शिवादाने तुकामाई राज्यस्तरीय महापारायण सोहळ्यास सुरूवात झाली आहे. परभणी शहरात चतुर्थ महापारायण सोहळ्याचे दि. ३१ डिसेंबर रोजी आयोजन करण्यात आले आहे. हा महापारायण सोहळा श्री रेणुका मंगल कार्यालयात सकाळी ८ ते दुपारी १२ वेळेत आयोजित करण्यात आला आहे. यावेळी सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी भक्व्य रक्तदान शिबिर देखील आयोजित करण्यात येणार आहे.
तुकामाई राज्यस्तरीय महापारायण सोहळ्याच्या यशस्वितेसाठी लवकरच विविध समित्या गठीत करण्यात येणार आहेत. या महापारायण सोहळ्यात सहभागी होऊ इच्छिणा-या भक्तांनी लवकरात लवकर नाव नोंदणी करावी, असे आवाहन श्री रेणुका महिला मंडळ परभणीच्या वतीने करण्यात आले आहे.
















