17.3 C
Latur
Saturday, November 23, 2024
Homeक्रीडापरवानगीशिवाय फोटो वापरल्यामुळे मनु भाकर करणार २ बड्या कंपन्यांवर कायदेशीर कारवाई

परवानगीशिवाय फोटो वापरल्यामुळे मनु भाकर करणार २ बड्या कंपन्यांवर कायदेशीर कारवाई

नवी दिल्ली : पॅरिस ऑलिम्पिक २०२४ च्या पहिल्या ४ दिवसांत देशातील १४० कोटी लोकांच्या चेह-यावर कोणी पदकाचा आनंद मिळवून दिला असेल तर तो मनु भाकरने. मनुने १० मीटर एअर रायफल नेमबाजीत वैयक्तिक आणि मिश्र सांघिक स्पर्धेत कांस्यपदक पटकावले आहे. सर्बजित सिंग मिश्र सांघिक स्पर्धेत मनुसोबत होता. या ऑलिम्पिकमध्ये आतापर्यंत भारताने ही दोनच पदके जिंकली आहेत. मनु भाकरने पदक जिंकल्यानंतर देशभरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. मनुच्या या कामगिरीबद्दल क्रीडा जगतासोबतच इतर क्षेत्रातील लोकांनीही तिचे अभिनंदन केले आहे.

दरम्यान, मनु भाकरने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकल्यानंतर आणि नेमबाजीत पदक जिंकणारी ती पहिली महिला ठरल्यानंतर व्यावसायिक क्षेत्रातूनही तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अनेक कंपन्यांनी त्यांच्या जाहिरातींसोबत मनुचे छायाचित्र लावून तिच्या कामगिरीबद्दल अभिनंदन केले आहे. मात्र मनुचे छायाचित्र तिच्या परवानगीशिवाय वापरणे अनेक कंपन्यांना महागात पडणार आहे. मनु या कंपन्यांवर कायदेशीर कारवाई करणार आहे.

या कंपन्यांवर होणार कायदेशीर कारवाई
मिळालेल्या माहितीनुसार, मनु भाकर तिच्या परवानगीशिवाय फोटो वापरल्याबद्दल ‘एलआयसी’ आणि ‘बजाज’ सारख्या कंपन्यांवर कायदेशीर कारवाई करत आहे. या कंपन्या मनु भाकरच्या नावाने स्वत:चे मार्केटिंग करत आहेत जे चुकीचे आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR