लातूर : प्रतिनिधी
नारायण नगर भागातील परिमल माध्यमिक विद्यालयाचा एस. एस. सी. बोर्ड परीक्षेचा १०० टक्के निकाल लागला असून त्यापैकी १०० टक्के गुण घेऊन ६ विद्यार्थीनी यशाची परंपरा कायम राखली आहे. यात तन्मया ज्ञानदेव दातीर, विक्रांत बाबुराव सावंत, मधुरा महेश चिटणीस, वैष्णवी फुलचंद निकम, श्रीयश संतोष भुजबळ, ईश्वरी बाळासाहेब सोनवणे यांनी १०० पैकी १०० टक्के गुण घेऊन विद्यालयास मानाचा तुरा मिळविला आहे. तसेच वेदांत वाघचौरे, अनुष्का हांडे, श्रेया भगोले, अदित्य बिराजदार, अनुक्रमे ९९.४० टक्के गुण घेऊन घवघवीत यश मिळवले आहे. ९५ टक्के पेक्षा अधिक गुण घेणारे ४९ विद्यार्थी असून ९० टक्के पेक्षा अधिक गुण घेणारे १०५ विद्यार्थी आहेत. २२३ विद्यार्थीनी विशेष प्राविण्यात येण्याचा मान मिळविला आहे.
विद्यार्थीचे अपार कष्ट, विद्यालयाने राबविलेले नावीण्यपुर्ण उपक्रम तसेच पालकांचा सहभाग यातून विद्यालयाला मिळालेले यश मोठे आहे. वरील सर्व यशस्वी विद्यार्थ्याचे कौतूक संस्थेचे संस्थापक तथा सचिव प्राचार्य बाबुराव जाधव, प्राचार्य श्रीनिवास जाधव पाटील, पर्यवेक्षक शेळके, कदम, मुख्याध्यापक पवार, भांगे, मुळे, गायकवाड, जारे, भालेकर, पाटील, शेलमोहेकर, कंधारे, बिराजदार, नारगुंडे, राठोड, जाधव, योगिता, मुळजे, गजरे, गुडापे, सुर्यवंशी यानी यशस्वी विद्यार्थ्याचे कौतुक केले आहे. तसेच विद्यालयाच्या वतीने गुणवंताचा सत्कार करण्यात आला.
……………….परीमल……………………
















