25 C
Latur
Saturday, March 7, 2026
Homeलातूरपरीक्षार्थी विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत

परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत

बाभळगाव : वार्ताहर
दयानंद शिक्षण प्रसारक मंडळ,  बाभळगाव द्वारा संचलित कै. व्यंकटराव देशमुख महाविद्यालय,  बाभळगाव येथे बारावी बोर्ड परीक्षेच्या पहिल्या दिवशी परीक्षा केंद्रावर संस्था आणि महाविद्यालयाच्या वतीने विद्यार्थ्यांचे प्रवेशद्वारावर गुलाब पुष्प देऊन मन:पूर्वक स्वागत करण्यात आले. परीक्षा केंद्रावर येणा-या प्रत्येक विद्यार्थ्याला शुभेच्छा देत सकारात्मक वातावरण निर्माण करण्यात आले.
या उपक्रमामुळे वद्यिार्थ्यांचा तणाव कमी होऊन आत्मविश्वास वाढल्याची भावना अनेक विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. महाविद्यालय प्रशासन, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचा-यांच्या उपस्थितीत हा स्वागत समारंभ उत्साहात पार पडला. परीक्षेसाठी आवश्यक सर्व सुविधा वेळेत उपलब्ध करून देत शिस्तबद्ध नियोजन करण्यात आल्याची माहिती संस्थेचे सचिव शाम देशमुख यांनी यावेळी दिली.
भयमुक्त आणि तणावमुक्त वातावरणात परीक्षा द्यावी, असे आवाहन प्राचार्य डॉ. दुष्यंत कटारे यांनी विद्यार्थ्यांना केले. ‘परीक्षा ही तुमच्या ज्ञानाची चाचणी आहे, भीती निर्माण करणारी प्रक्रिया नव्हे. आत्मविश्वास ठेवा, वेळेचे योग्य नियोजन करा आणि शांत मनाने प्रश्नपत्रिका सोडवा,’’ असे मार्गदर्शन त्यांनी केले. परीक्षा केंद्रप्रमुख म्हणून प्रा. विवेक कदम, प्रा. सोपान डोपे, हनुमंत शिंदे हे काम पाहत आहेत. यावेळी गणेश देशमुख, मुख्याध्यापक आर.डी. गायकवाड, पांडुरंग चेवले, डॉ. शहराज मुळे, डॉ. नरेंद्र देशमुख, डॉ. महवीर कटके, डॉ. माना गायकवाड, प्रा. संदिपान चेवले, डॉ. विवेक जाधव, डॉ. अंगद कोते, डॉ. अजित भांजी, डॉ. जयदेवी पवार, डॉ. वैशाली माढेकर, डॉ. सुरेशकुमार कांबळे, डॉ. कांतराव पोले, डॉ. पांडुरंग मुंढे यांनीही विद्यार्थ्यांना परीक्षेकरिता शुभेच्छा दिल्या.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR