Homeलातूरपर्यावरण संवर्धनासाठी लातूर-नांदेड सायकल यात्रा

पर्यावरण संवर्धनासाठी लातूर-नांदेड सायकल यात्रा

लातूर : प्रतिनिधी
पर्यावरण संवर्धनासह प्लास्टिक मुक्ती, वृक्षारोपण, वृक्ष संवर्धन, पाणी आडवा पाणी जिरवा आणि मोबाईलचे दुष्परिणाम आदी विषयांवर जनजागृती करत माणूस प्रतिष्ठान संचलित माझं घरच्या विद्यार्थ्यांनी लातूर-नांदेड सायकल प्रवास नुकताच यशस्वी केला. या सायकल यात्रेमध्ये माझं घरचे प्रमुख शरद झरे व प्रा.डॉ विनोद चव्हाण यांच्यासह प्रकल्पातील एकूण २५ मुला मुलींचा सहभाग होता.

नांदेड येथे नवज्योत फाउंडेशन द्वारा आयोजित बालसंस्कार शिबिराला भेट देण्यासाठी लातूर ते नांदेड जनजागृती करत शुक्रवारी सकाळी ही सायकल यात्रा निघाली होती. सायकल स्वारांनी लातूर, कोळपा, ममदापूर, आष्टा, घरणी, चाकुर, चापोली, अहमदपूर, माळेगाव माळाकोळी, लोहा या गावांतून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत नांदेड मध्ये शनिवारी सकाळी प्रवेश केला. परत याच मार्गे ३६० किमीचा प्रवास करत सायकल यात्रेचे सोमवारी सकाळी लातुरात आगमन झाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR