पशुपालकांना उद्योजकतेकडे वळविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे आवश्यक 

लातूर : प्रतिनिधी
पशुपालकांना वेळेवर उपचार, रोगप्रतिबंधक लसीकरण आणि आधुनिक पशुपालन व्यवस्थापन यावर भर देण्याची गरज आहे. पशुपालकांना उद्योजकतेकडे वळविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे आवश्यक आहे. तसेच श्वानांचे निर्बीजीकरण करून लातूर जिल्हा रेबीजमुक्त करण्याचे आवाहनही लातूरचे जिल्हाधिकारी तथा पशुवैद्यक डॉ. भारत बास्टेवाड यांनी केले.
जागतिक पशुवैद्यक दिनानिमित्त लातूर येथे पशुसंवर्धन विभाग, लातूर व एमएसडी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘पशुवैद्यक : अन्नसुरक्षा व सार्वजनिक आरोग्याचे रक्षक’ या विषयावर जिल्हास्तरीय तांत्रिक परिसंवाद उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. बास्टेवाड बोलत होते. यावेळी प्रादेशिक सहआयुक्त डॉ. नाना सोनवणे, कर्नाटक पशुवैद्यकीय विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा. डॉ. शिवशंकर उस्तूरगे, कृषि महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. बाबासाहेब ठोंबरे, देवणी गोवंश संघटनेचे डॉ. भास्कर बोरगावकर, ज्येष्ठ पशुवैद्यकीय शास्त्रज्ञ डॉ. अनिल भिकाने, आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी डॉ. भिकाने म्हणाले की, देशाच्या अर्थव्यवस्थेत पशुवैद्यकांचे योगदान अत्यंत मोलाचे असून अन्नसुरक्षा, अन्न सुरक्षितता व सार्वजनिक आरोग्याचे खरे रक्षक म्हणून पशुवैद्यकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. यावेळी प्रा. डॉ. ठोंबरे म्हणाले, पशुवैदक, शेतकरी, पशुपालक व शास्त्रज्ञ् यांनी पशुधनाच्या पैदास, आहार, व्यवस्थापन व आरोग्य या बाबत भविष्यवेध घेउन गुणात्मक व संख्यात्मक पशुधन वृद्धीतुन पशुपालक आत्मनिर्भर होण्यासाठी संयुक्त प्रयत्न करावेत. तसेच डॉ. सोनवणे व डॉ. बोरगावकर यांनी समयोचित मनोगते व्यक्त केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. राजकुमार पडिले यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. श्रीधर शिंदे यांनी केले. त्यांना डॉ. समीर सास्तुरकर यांनी सहकार्य केले. आभार प्रदर्शन डॉ. सुधाकर साळवे यांनी केले. कार्यक्रमास एमएसडीचे प्रक्षेत्र व्यवस्थापक कुणाल घुगांर्डे यांचे विशेष सहकार्य लाभले. या कार्यक्रमास जिल्ह्यातील १५० हून अधिक पशुवैद्यकीय अधिकारी, प्राध्यापक, खाजगी पशुवैद्यक, उद्योजक व पशुपालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Hot this week

गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला अभिनेत्रीचा मृतदेह; अवघ्या ३५ व्या...

मुंबई : मल्याळम चित्रपटसृष्टीमधील अभिनेत्री रेंजुषा मेनन सोमवारी सकाळी...

सचिन पायलट आणि सारा अब्दुला यांचा घटस्फोट

जयपूर : राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते सचिन...

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
'उद्योगाच्या जागेवर शिकवणीचे दुकान? गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या लढ्याची इनसाईड स्टोरी!
10:52
Video thumbnail
डॉ. मनोज शिरूरे यांच्या अटकेनंतर CBI ची पुन्हा धाड; पथकाकडून घरच्यांची चौकशी, मोबाईल डेटा रडारवर
01:55
Video thumbnail
CBI च्या कारवाई दरम्यान मोठा खोळंबा, अधिकारी लिफ्टमध्ये अडकल्याने उडाली खळबळ
00:36
Video thumbnail
स्टेबल लाईनवरील रिकाम्या डब्याला आग; नांदेड रेल्वे प्रशासनाची तत्परता, मोठी दुर्घटना टळली
02:08
Video thumbnail
तेलंगणाच्या पोचमपाड धरणाचा नांदेडला फटका! ८ तालुक्यांतील पूरग्रस्त शेतकऱ्यांचा मोर्चा
04:53
Video thumbnail
लातुरात प्रशासकीय सुस्तीविरोधात उद्रेक! भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू
05:16
Video thumbnail
लातुरात 'सीबीआय'चा तिसरा मोठा दणका! तीन तासांच्या चौकशीनंतर डॉ. मनोज शिरुरेंना पुण्यातून अटक
03:12
Video thumbnail
भटक्या कुत्र्यांच्या भीषण हल्ल्यात २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू; संतप्त नातेवाईकांनी मांडला ठिय्या
02:39
Video thumbnail
लातूर उद्योग भवनमधील प्रा. शिवराज मोटेगावकरचे चार ते पाच प्लॉट्स वादाच्या भोवऱ्यात
03:58
Video thumbnail
धर्माबाद तालुक्यात डिझेलचा तीव्र तुटवडा; पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा
01:59
Video thumbnail
धीरजभैय्या देशमुख यांच्या नेतृत्वात लातूरमध्ये क्रिकेटचा महाकुंभ; विलासराव देशमुख चॅम्पियनशिप २०२६..
02:56
Video thumbnail
NEET PEPAR LEAK|डॉक्टरांच्या मुलांसह मोटेगावकरांच्या मुलांसाठी खास क्लास ?CBI च्या चौकशीत उघड
01:49
Video thumbnail
BIG BREAKING : लातूरच्या नारायण नगर परिसरात CBI ची धडक;विद्यार्थ्याने नीट पेपर विकत घेतल्याचा संशय
01:48
Video thumbnail
टेंभुर्णीत भीषण आग! फर्निचर, हार्डवेअरसह इलेक्ट्रॉनिक्सची ३ दुकाने खाक; कोट्यवधींचे नुकसान
01:46
Video thumbnail
हिमायतनगर तालुक्यात पेट्रोल-डिझेलचा प्रचंड तुटवडा; शेतीची कामे रखडल्याने शेतकरी आक्रमक
03:18

Latest news