पश्चिम बंगालमध्ये खेला

ममतांना पक्ष, चिन्ह मिळाले, उमेदवाराची माघार

कॉंग्रेसला पाठिंबा देताच थेट उमेदवाराला अटक

पोटनिवडणुकीआधी
मोठी उलथापालथ

कोलकाता : वृत्तसंस्था
ममता बॅनर्जी यांचे पोटनिवडणुकीआधी पक्ष, चिन्हे गोठविल्यानंतर आज (शुक्रवार, दि. १८ सप्टेंबर २०२६) त्यांना पक्षाचे ममता ऑल इंडिया तृणमूल कॉंग्रेस हे नाव मिळाले आणि फुटबॉल खेळाडू हे पक्षचिन्ह मिळाले. त्यामुळे नंदीग्राम पोटनिवडणुकीच्या तयारीला लागले असतानाच ऐनवेळी त्यांच्या उमेदवार संचिता प्रधान डे यांनी माघार घेतली. त्यामुळे लगेचच त्यांनी पत्रकार परिषद घेऊन कॉंग्रेसचे मिलन प्रधान यांना पाठिंबा जाहीर केला. यानंतर काही वेळातच कॉंग्रेसच्या उमेदवारालाही जुन्या एका प्रकरणात पोलिसांनी अटक केली. त्यामुळे पोटनिवडणुकीआधी चांगलीच उलथापालथ पाहायला मिळत असून, एका अर्थाने लोकशाहीचे अक्षरश: धिंडवडे उडवले जात असल्याचे चित्र आहे.

नंदिग्राम विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीआधी पश्चिम बंगालमध्ये राजकीय वातावरण तापले आहे. ममता बॅनर्जी गटाच्या उमेदवार संचिता प्रधान डे यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी यांची नबन्ना येथे भेट घेतली. त्यानंतर त्यांनी निवडणुकीच्या आखाड्यातून माघार घेतली. आपल्या माघारीचे कारण डे यांनी अद्याप जाहीर केलेले नाही. संचिता प्रधान डे पेशाने शिक्षिका आहेत. त्या शुक्रवारी पती सत्यजीत यांच्यासह राज्य सचिवालयात पोहोचल्या होत्या. मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांची त्यांनी भेट घेतली. यानंतर त्यांनी पोटनिवडणुकीतून माघार घेतली. त्यामुळे ममतांकडे आता उमेदवारच उरला नाही. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख १९ सप्टेंबर आहे.

संचिता प्रधान डे यांनी अचानक माघार घेतल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसचे उमेदवार मिलन प्रधान यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. तशी घोषणा त्यांनी पत्रकार परिषदेत केली. यावेळी त्यांनी सत्ताधारी भाजपवर सडकून टीका केली आणि इंडिया आघाडी मजबूत करण्यासाठी काँग्रेसला पाठिंबा देत असल्याचे बॅनर्जी म्हणाल्या. पण काही वेळातच प्रधान यांना अटक झाली.

संचिता प्रधान डे यांची माघार आणि मिलन प्रधान यांना झालेली अटक यामुळे नंदिग्राम पोटनिवडणुकीत ममता बॅनर्जी यांचा पक्ष आणि काँग्रेस या दोन्ही प्रमुख पक्षांना जबर धक्का बसला आहे. विशेष म्हणजे बंगालमध्ये गृहमंत्रिपद मुख्यमंत्री असलेल्या अधिकारी यांच्याकडे आहे. त्यामुळे ममता बॅनर्जी आणि कॉंग्रेसला कोंडित पकडत मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी खेला होबे सुरू केला आहे. त्यामुळे पोटनिवडणुकीच चांगलीच गाजण्याची चिन्हे आहेत.

ममतांचे निवडणूक
चिन्ह फुटबॉल खेळाडू
ममता बॅनर्जी गटाला ममता ऑल इंडिया तृणमूल कॉंग्रेस हे नवे नाव देण्यात आले असून फुटबॉल खेळाडू हे चिन्ह देण्यात आले आहे तर बंडखोर गटाला डेमॉक्रॅटिक तृणमूल कॉंग्रेस असे नाव देण्यात आले असून लिफाफा चिन्ह देण्यात आले आहे. हे नाव व चिन्ह आगामी पोटनिवडणुकीसाठी लागू आहेत.

भाजपने थेट माझ्या
पक्षाला हायजॅक केले
निवडणूक आयोगाने काल ममता बॅनर्जी यांच्या यांचे पक्ष आणि चिन्ह गोठविले आणि आता ऑल इंडिया तृणमूल कॉंग्रेस असे नाव आणि फुटबॉल खेळाडूचे चिन्ह दिले. यामुळे ममता बॅनर्जी आक्रमक झाल्या असून, त्यांनी जोरदार हल्लाबोल करीत भाजपनेच पक्षाला हायजॅक केल्याचे म्हटले. आमचा पक्ष घटनात्मक पदाचा अनादर करीत नाही. परंतु आजचा दिवस देशाच्या लोकशाही इतिहासातील काळा दिवस आहे, असे त्या म्हणाल्या.

भाजपला पक्ष चोरून
सत्ता वाचवायचीय
नंदीग्राम पोटनिवडणुकीसाठी कॉंग्रेसचे उमेदवार मिलन प्रधान यांना करण्यात आलेली अटक हा योगायोग नाही, राजकीय सुडबुद्धी आहे, लोकशाहीची हत्या आहे, अशा शब्दांत कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी हल्लाबोल केला. भाजपचा निष्पक्ष लोकशाहीवर विश्वास नाही. त्यामुळेच कधी मतचोरी, कधी सरकार चोरी आणि कधी पक्ष चोरी करून सत्ता वाचवायची आहे. त्यांना निवडणुका लढवायची इच्छा नाही तर त्यांना निवडणुकीतील लढाईच संपवून टाकायची आहे. पण कॉंग्रेस घाबरणार नाही. आम्ही लढू आणि जिंकूही, अशी टीका राहुल गांधींनी केली.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur Farmer Sucide|दुष्काळ अन् कर्जाचा ताण; निलंग्यात ४१ वर्षीय शेतकऱ्याची आत्महत्या
01:41
Video thumbnail
Nanded|हिमायतनगरमध्ये दुर्गामातेच्या आगमनाची धूम! आदिवासी नृत्याने वेधले सर्वांचे लक्ष
02:56
Video thumbnail
Latur|उदगीरच्या सोमनाथपूरमध्ये शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ
01:34
Video thumbnail
Nanded|माहूर गडावर रेणुका मातेच्या नवरात्रोत्सवाला सुरुवात!
03:36
Video thumbnail
Latur|लातुरात बेशिस्त ऑटोचालकांवर वाहतूक पोलिसांचा कारवाईचा बडगा!
01:18
Video thumbnail
गतवर्षी अति पावसामुळे कापसाच्या वाती तर यावर्षी वाती साठी देखील कापूस नाही
02:01
Video thumbnail
Latur|अवैध सावकारीला लगाम घालण्यासाठी लातूर पोलिसांचे मोठे पाऊल!
03:48
Video thumbnail
Latur|१२ ऑक्टोबरला प्राध्यापकांचे राज्यव्यापी धरणे आंदोलन
06:43
Video thumbnail
Latur|विहिरीत मुबलक पाणी, पण नळ कोरडेच! जलजीवन योजनेचा उदगीरमध्ये बोजवारा?
04:19
Video thumbnail
Nanded|भाजपच्या साडी वाटप कार्यक्रमात गोंधळ! साड्यांसाठी महिलांची झटापट
01:01
Video thumbnail
Latur|प्यारे जिया खान यांच्याविरोधातील कथित आक्षेपार्ह विधानांचा निषेध; संबंधितांवर कारवाईची मागणी
07:05
Video thumbnail
शेतकऱ्यांचे दुःखाश्रू अन् कोरे निवेदन! नीलमताई गोऱ्हे यांच्यासमोर मांडली दुष्काळाची भीषणता
01:37
Video thumbnail
Latur|दुष्काळग्रस्त भागात चाऱ्याची तातडीने व्यवस्था करा; नीलम गोऱ्हेंची मागणी
04:01
Video thumbnail
Latur|भाजप नगरसेविकेच्या अतिक्रमणाविरोधात ठिय्या; भाजप कार्यकर्त्यांचाच आंदोलनात सहभाग!
03:17
Video thumbnail
Bashir Shaikh|बशीर शेख प्रकरणाची एसआयटी चौकशी करा; लातूरकरांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
05:43

Latest news