16.8 C
Latur
Saturday, December 6, 2025
Homeअंतरराष्ट्रीयपहिला चार्जिंग हायवे तयार, धावताना कार होणार चार्ज

पहिला चार्जिंग हायवे तयार, धावताना कार होणार चार्ज

चार्ज ऐज यु ड्राईव्ह । कार वायरलेस पद्धतीने चार्ज होणार; रस्ता स्वत:च ऊर्जेचा स्रोत बनणार; चार्जिंग स्टेशनवर थांबण्याची गरज नसेल

पॅरिस : वृत्तसंस्था
इलेक्ट्रीक कार धावतानाच चार्जिंग करणारा हायवे तयार करण्यात यश आले आहे. त्यामुळे कार आपोआप चार्ज होणार आहे. फ्रान्सने जगातला पहिला चार्जिंग हायवे तयार केला आहे. जो वाहन धावत असतानाच त्यांना वायरलेस पद्धतीने चार्ज करु शकणार आहे. त्यामुळे अशा प्रकारे रस्ते स्वत:च ऊर्जेचा स्रोत बनणार आहेत. आणि कार चालवतानाच आपोआप चार्जिंग होणार आहे.

हा प्रयोग पॅरीसपासून सुमारे ४० किलोमीटर दक्षिण-पश्चिम स्थित ‘ए १०’ हायवेवर सुरु करण्यात आला आहे. अनेक संघटनांनी मिळून या योजनेला विकसित केले आहे. याचे नाव ‘चार्ज ऐज यु ड्राईव्ह’ असे आहे. फ्रान्समध्ये ‘ए १०’ हा हायवे १.५ किलोमीटर लांबीचा असून यात रस्त्याच्या आत कॉईल लावण्यात आल्या आहेत. या कॉईलवरुन इलेक्ट्रीक कार जात असताना चार्जिंग होणार आहे. चाचणीत हा प्रयोग यशस्वी झाला आहे. याची कमाल शक्ती ३०० किलोवॅटहून अधिक आहे. आणि सरासरी ऊर्जा हस्तांतर क्षमता २०० किलोवॅट इतकी आढळली आहे.

जेव्हा कोणतेही वाहन रस्त्याच्या खाली लावलेल्या विद्युत चुंबकीय कॉईलवरुन जाईल तेव्हा चुंबकीय क्षेत्राच्या माध्यमातून वीज वाहनावर लागलेल्या रिसिव्हरपर्यंत पोहचेल. याचा मोठा फायदा हा आहे की वाहनांना चार्जिंगसाठी चार्जिंग स्टेशनवर उभे ठेवण्याची काहीही गरज नाही. रस्त्याच्या खाली लावलेले ट्रान्समिट कॉईल आणि रिसीव्हर कॉईल दरम्यान वीजेचे अदान-प्रदानाला सेंसर आणि सॉफ्टवेअरच्या माध्यमातून वास्तविक काळात नियंत्रण केले जाऊ शकते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR