22.9 C
Latur
Monday, July 7, 2025
Homeलातूरपहिल्या फेरीत ११ हजार विद्यार्थ्यांचा प्रवेश 

पहिल्या फेरीत ११ हजार विद्यार्थ्यांचा प्रवेश 

लातूर : प्रतिनिधी
व्यवस्थापन कोटयाच्या प्रवेश प्रक्रीयेनंतर ११ वी प्रवेशाची पहिली सर्वसाधारण गुणवत्ता यादी जून अखेर जाहिर झाल्यानंतर सोमवार दि. १ जुलै पासून प्रवेश प्रक्रीया सुरू झाली होती. ज्या विद्यार्थ्यांचे यादीत नंबर लागले आहेत, त्यापैकी ११ हजार ४९२ विद्यार्थ्यांचे कला, वाणिज्य व विज्ञान शाखेत अनुदानित, अंशत: अनुदानित, विना अनुदानीत, स्वंय अर्थसहित कोटयातून प्रवेश निश्चित झाले आहेत. पहिल्या प्रवेश फेरीत प्रवेश निश्चित करण्यासाठी विद्यार्थ्यांना आजची शेवटची संधी असणार आहे. या नंतर विद्यार्थ्यांना पुढच्या फेरीसाठी पुन्हा नव्याने अर्ज सादर करावे लागणार आहेत.
इयत्ता ११ वी ची प्रवेश प्रक्रीया लवकर मार्गी लागवे म्हणून इयत्ता १० वी ची परीक्षा लवकर घेऊन लवकर निकाल लावण्यात आला. तसेच शिक्षण विभागाने या वर्षापासून इयत्ता ११ वी ची प्रवेश प्रक्रीया ऑनलाईन राबविण्याचा निर्णय घेतला. मात्र तांत्रीक कारणामुळे प्रवेश प्रक्रीया राबविण्यासाठी उशिर झाला.  त्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये नाराजी पसरली होती. लातूर जिल्हयातील इयत्ता ११ वी च्या २५९ कनिष्ठ महाविद्यालयातील ५६ हजार ३७० जागेसाठी २५ हजार ९३५ विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेश अर्जांची नोंदणी केली. २४ हजार ८८ विद्यार्थ्यांनी १ ते १० महाविद्यालयाचे पसंती क्रम देऊन प्रवेश अर्ज दाखल केले. २८ जून रोजी सर्वसाधारण प्रवेशाची यादी शासनाने पोर्टलवर जाहिर केली.
तत्पूर्र्वी ११ वी प्रवेशाचा महाविद्यालयांचा व्यवस्थापन कोटा व इन हाऊस कोटयातून २ हजार ७२० विद्यार्थ्यांचे प्रवेश झिरो राऊंड मध्ये झाले. अनुदानित जागेवर ६ हजार ६६४ विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले. स्वंय अर्थसहित कनिष्ठ महाविद्यालयात १ हजार २१८ विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले. तर विना अनुदानित जागेसाठी ८९० विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत. अशा प्रकार गेल्या सहा दिवसात ११ हजार ४९२ विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत. ज्या विद्यार्थ्यांचे पहिल्या फेरीत प्रवेश निश्चित झाले नाहित. त्यांच्यासाठी सोमवार दि. ७ जुलै ही आजची प्रवेशासाठी शेवटची संधी असणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालयात जाऊन प्रवेश घ्यावे लागणार आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR