पाकचे धाडस : अफगाणला दिली खुल्या युद्धाची धमकी

 

इस्लामाबाद : वृत्तसंस्था
पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात सध्या मोठा वाद चालू आहे. या दोन्ही देशांनी एकमेकांवर हल्ले देखील केले आहेत. यामध्ये दोन्ही बाजूचे सैनिक, सामान्य नागरिक मारले गेले आहेत. दरम्यान, आता पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा मोहम्मद आसिफ यांनी अफगाणिस्तानला थेट खुल्या युध्दाची धमकी दिली आहे. तुर्की येथील सुरू असलेली चर्चा यशस्वी झाली तर ठीक आहे, नाहीतर थेट युद्ध होईल, असे आसिफ यांनी सांगून टाकले आहे.

सध्या अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधी झाली आहे. या शस्त्रसंधीच्या चार ते पाच दिवसांनीच पाकिस्तानच्या आसिफ यांनी अफगाणिस्तानला ही धमकी दिली. एका मुलाखतीत त्यांनी अफगाणिस्तान सोबतच्या संघर्षावर सविस्तर भूमिका मांडली. अफगाणिस्तानला शांतता हवी आहे. मात्र तुर्की येथे चालू असलेल्या चर्चेत ठोस असं काहीही समोर न आल्यास त्यांच्यासोबत खुले युद्ध करण्याचा आमच्याकडे पर्याय आहे, असे आसिफ यांनी सांगितले आहे. त्यांनी पाकिस्तानी संसदेत याच युद्धावर आपली भूमिका मांडली. यावेळी बोलताना त्यांनी आपल्या भाषणात अफगाणिस्तान दहशतवाद्यांना पोसत आहे, असा दावा केला. सोबतच आम्ही अफगाणिस्तानच्या एकूण ४० लाख निर्वासितांना आश्रय दिला. पण आम्हाला त्या बदल्यात फक्त बंदुकीच्या गोळ्या मिळाल्या, असा हल्लाबोल आसिफ यांनी केला.

सध्या अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यात तुर्कीमध्ये शांततेसाठी चर्चा चालू आहे. कतार आणि तुर्की या देशांच्या मध्यस्थीने ही चर्चा चालू आहे. या चर्चेसाठी पाकिस्तानकडून दोन सदस्यीय शिष्टमंडळ तसेच अफगाणिस्तानकडून सहा सदस्यीय शिष्टमंडळाचा समावेश आहे. यामध्ये गृह, संरक्षण, परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिका-यांचा समावेश आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur -गवळी समाजाची 15 वर्षांची परंपरा कायम; आषाढ महोत्सवात भक्तांची गर्दी
03:25
Video thumbnail
Purna|आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्णा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम
02:40
Video thumbnail
Latur|वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी संभाजी सेनेचे आंदोलन
03:44
Video thumbnail
Nanded|: 'गुंगी गुडिया' वक्तव्यावरून राष्ट्रवादी आक्रमक; हर्षवर्धन सपकाळांविरोधात जोडे मारो आंदोलन
03:29
Video thumbnail
Latur|जळकोट तालुक्यात जलस्रोत तुडुंब; पाण्याचा प्रश्न मिटला, शिवार हिरवाईने नटले
01:14
Video thumbnail
Solapur| मोहोळमध्ये संजय राऊत यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
01:19
Video thumbnail
Latur|नांदेड–बिदर महामार्गावरील सिमेंट रस्त्याला मोठ्या भेगा; अपघाताचा धोका
00:59
Video thumbnail
Latur|शिवराज पाटील चाकूरकर यांच्या भव्य स्मारकाची तयारी; चार दिवसांत मोठा निर्णय!
03:22
Video thumbnail
Nanded|धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर राकेश टिकैतांचे मोठे वक्तव्य..
01:30
Video thumbnail
Latur|खरीप हंगामावर एल निनोचं सावट; शेतकऱ्यांची नजर आकाशाकडे
02:40
Video thumbnail
Latur|बोगस खत विकणाऱ्यांविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार
04:25
Video thumbnail
Parbhani|परभणी-गंगाखेड महामार्गाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह;202 कोटी खर्च करूनही महामार्गाची दुरवस्था
01:21
Video thumbnail
Nanded|नांदेड हादरलं! दहावीतील विद्यार्थ्याचा वर्गमित्रावर चाकू हल्ला
02:10
Video thumbnail
भूम तालुक्यातील आंबी जयवंतनगर मार्ग बंद;देवगावरोड वरील पूल गेला वाहून,अनेक गावांचा संपर्क तुटला
00:17
Video thumbnail
Nanded|हिमायतनगरमध्ये प्रशासनाचा बुलडोझर; उमर चौक अतिक्रमणमुक्त
01:29

Latest news