21.6 C
Latur
Thursday, October 10, 2024
Homeराष्ट्रीयपाकव्याप्त काश्मीरने भारतात सामील व्हावे : राजनाथ सिंह

पाकव्याप्त काश्मीरने भारतात सामील व्हावे : राजनाथ सिंह

जम्मू : वृत्तसंस्था
पाकव्याप्त काश्मीरच्या जनतेने भारतात सामील व्हावे, असे आवाहन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केले आहे. आम्ही तुम्हाला आपले मानतो, तर पाकिस्तान तुम्हाला विदेशी मानतो, असे ते म्हणाले. जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीनिमित्त रामबन मतदारसंघात भाजप उमेदवार राकेश सिंह ठाकूर यांच्या प्रचारार्थ आयोजित प्रचारसभेत राजनाथ सिंह बोलत होते.

कलम-३७० रद्द केल्यापासून राज्यात होत असलेल्या बदलाचे स्वागत करून राजनाथ सिंह म्हणाले, येथील युवकांच्या हाती आता पिस्तूल किंवा रिव्हॉल्व्हरऐवजी लॅपटॉप-कॉम्प्युटर आहेत, विकास हवा असेल, तर भाजप सरकार स्थापन करण्यासाठी पाठिंबा द्या, असे आवाहन त्यांनी केले.

दरम्यान, भाजपचे नेते जम्मू-काश्मीरमधील हिंदूमध्ये भीती पसरवू पाहत असल्याचे फारुख अब्दुल्ला यांनी म्हटले आहे. या हेतूनेच भाजप नेत्यांनी जम्मूवर लक्ष केंद्रित केले आहे. आघाडी पुन्हा सत्तेत आली, तर प्रदेशात पुन्हा दहशतवाद बोकाळेल, अशी अनाठायी भीती पसरवून जनतेची दिशाभूल केली जात असल्याचे ते म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR