29.9 C
Latur
Tuesday, February 10, 2026
Homeअंतरराष्ट्रीयपाकिस्तानचे ४ नव्हे, १६ तुकडे करा : अलीम खान

पाकिस्तानचे ४ नव्हे, १६ तुकडे करा : अलीम खान

लाहोर : वृत्तसंस्था
आर्थिकदृष्ट्या भिकेला लागलेल्या पाकिस्तानमध्ये दिवसेंदिवस विरोध प्रदर्शन होण्याचे प्रमाण वाढत आहे. पाकिस्तानच्या बलुचिस्तान, खैबर पख्तुनख्वा आणि सिंध प्रांतातील लोक पाकिस्तान सरकार विरोधात उभे रहात आहेत. बलुचिस्तान तर पहिल्यापासूनच पाकिस्तानपासून वेगळा होण्याची मागणी करतो आहे. त्यामुळे पाकिस्तानचे तुकडे होण्याची भीती कायम असते. त्यातच आता पाकिस्तानच्या एका मंत्र्याने पाकिस्तानला चार प्रांतात नाही तर १६ तुकड्यात विभागलं पाहिजे अशी मागणी केली आहे.

इस्तेहकाम पाकिस्तान पार्टीचे अध्यक्ष आणि पाकिस्तानचे केंद्रीय संचार मंत्री अब्दुल अलीम खान यांनी पाकिस्तानला १६ प्रांतात विभागले पाहिजे त्यामुळे लोकांना सहज सुविधांचा लाभ घेता येईल. यासाठी पाकिस्तानच्या सर्व राजकीय पक्षांनी एकत्र आलं पाहिजे असं देखील वक्तव्य केलं आहे. लाहोरपासून जवळपास ५० किलोमीटर दूर कामोके येथे पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात अब्दुल अलीम खान बोलत होते.

ते पुढे म्हणाले, आपल्याला प्रांतांचे नाव बदलण्याची गरज नाही. आम्ही पंजाबमध्ये उत्तर, दक्षिण, पश्चिम आणि पूर्व असे नवे प्रांत तयार करायला हवेत. राजकीय पक्षांनी संकुचित विचार बाजूला सोडून उदारता दाखवली पाहिजे. कारण हे सर्वांच्याच हिताचे आहे. ‘डॉन’च्या मते, खान यांनी फक्त पंजाबच नाही तर सिंध, बलुचिस्तान आणि खैबर पख्तूनख्वा या चारही प्रांतांची विभागणी करण्याची मागणी केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR