रावळपिंडी : वृत्तसंस्था
एकीकडे युक्रेन आणि रशिया यांच्यात सुरु झालेले युद्ध अजून थांबण्याचे नाव घेत नाही. तर दुसरीकडे इस्रायल आणि पॅलेस्टाईन युद्ध सुरु आहे. त्यातच आता पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात देखील संघर्ष सुरु झाला आहे. खैबर पख्तुनख्वा सीमा भागात पाकिस्तानी सुरक्षा दल आणि अफगाणिस्तानच्या तालिबानी सैनिकांमध्ये झालेल्या चकमकीत दोन प्रमुख कमांडरसह ८ अफगाण तालिबानी सैनिक ठार झाले. खुर्रम सीमावर्ती जिल्ह्यात गोळीबारात १६ सैनिक जखमी झाले आहेत.
अफगाण सैनिक आणि पाकिस्तानी सुरक्षा दलांमध्ये गोळीबार होण्याची ही पहिलीच वेळ नाही. तालिबान पाकिस्तानमध्ये दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देण्यासोबतच आंतरराष्ट्रीय सीमेवरील सैन्यावर खुलेआम हल्ले करत आहेत.
तणावपूर्ण परिस्थितीमुळे दोन्ही देशांमधील व्यापार ठप्प झाला आहे. पाकिस्तानातील कुर्रममधील मरघान येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात निमलष्करी दलाचा फ्रंटियर कॉर्प्सचा अधिकारी ठार झाला आणि तीन जण जखमी झाले.