पाण्याअभावी रबी हंगाम संकटात 

लातूर : एजाज शेख
यंदाच्या पावसाळ्यात लातूर जिल्ह्याच्या सरसरीपेक्षा निम्माच पाऊस पडला. पुरेशा पावसाअभावी पिण्याच्या पाण्याचीच टंचाई जाणवत असेल तर रबी पिकांना पाणी कुठून मिळणार, अशी स्थिती लातूर जिल्ह्याची आहे. दुसरीकडे पाण्याअभावी रबी हंगाम संकटात सापडल्याने खरीपासोबतच रबी हंगामावरही शेतक-यांच्या हातून जाणार आहे, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे संपूर्ण ग्रामीण कृषी अर्थ व्यवस्थाच अडचणीत येणार आहे.
जिल्ह्यात रबी हंगामात ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यांत लागवड होते. काही ठिकाणी ऊसतोडणी झाल्यानंतर जानेवारीअखेरपर्यंत लागवडी होतात. यादरम्यान एक-दोन वेळा जरी चांगला पाऊस पडला तर जिल्ह्यात २ लाख ७२ हजार २२५ हेक्टरवर रबीची पेरणी होण्याची शक्यता आहे. त्यात ज्वारी २६ हजार १६३ हेक्टरवर, मका ७२६ हेक्टर, गहू १० हजार २९२ हेक्टर, हरभरा २ लाख २६  हजार ४१३ हेक्टर,  करडई ८ हजार ४२७ हेक्टर, सूर्यफूल ३३ हेक्टर, जवस ८२ हेक्टर, असे पीकनिहाय क्षेत्र आहे. परंतू, पाऊसच नाही पडला तर मात्र चा-याच्याच पिकांची ५ ते १० टक्के पेरणी होऊ शकेल, असा अंदाज आहे.
भिस्त असलेल्या परतीच्या पावसाचे दगा दिला
लातूर जिल्ह्यात मोसमी पाऊस जेमतेमच पडतो. परंतु, परतीचा पाऊस हमखास आणि दमदार पडलो, असा पुर्वानूभव आहे. परंतु, यावर्षी ना मोसमी पाऊस पडला ना भिस्त असलेल्या परतीच्या पावसाने दिलासा दिला. १० ऑक्टोबरदरम्यान परतीचा पाऊस लातूर जिल्ह्यातून माघारी गेला. खरीप पिकांमुळे शेत जमिनीतील ओलावा कमी झालेला असतो. परतीच्या पावसाने पुन्हा शेत जमिनीत ओलावा वाढतो. मात्र यंदा तसे झालेलेच नसल्यामुळे जिल्ह्यातील भूजलपातळी कमालीची खोल गेली आहे. यंदा परतीचा पाऊस न पडल्यामुळे आणि पावसाळ्यात ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यांत खंड पडल्यामुळे जमिनीत मुळातच ओेलावा कमी आहे. विहिरी, कुपनलिकांमध्ये पाण्याची पातळी खालवली आहे. त्यात तापमान वाढ झाल्यामुळे सिंचनासाठी पाण्याची टंचाई जाणवत आहे.  शेत जमीन पूर्णपणे भेगाळली आहे, अशा स्थितीत रबी हंगामातील पेरणी शक्यच नाही.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

सुर्यकांत सरन्यायाधीशांच्या खुर्चीवर बसण्याच्या लायक नाहीत

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सरन्यायाधीश सूर्यकांत आणि...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

पुण्यात उभारणार महाराष्ट्रातील सर्वांत मोठे बसस्थानक; ८२५ कोटींचा पुनर्विकास...

पुणे : पुण्यातील शिवाजीनगर एसटी बसस्थानकाचा लवकरच कायापालट होणार...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur News | ऐन दुष्काळात लाखो लिटर पाणी गटारात; स्वातंत्र्य सैनिक नगरमध्ये जलवाहिनी फुटली
01:53
Video thumbnail
LIVE - आमदार अमित देशमुख यांच्या हस्ते किसना डायमंड आणि गोल्ड ज्वेलरी शॉपच उद्घाटन
00:00
Video thumbnail
Dharmabad News | सर्पदंशाच्या रुग्णाची रुग्णवाहिका रस्त्यात बंद
01:17
Video thumbnail
Latur Bank Election| बाभळगावात शिट्टी वाजवून सहकार पॅनलचा जल्लोष; १९ पैकी १४ जागांवर विजय
00:47
Video thumbnail
Diliprao Deshmukh Reaction | धीरज देशमुख कॅप्टन, विजयाचे श्रेय त्यांना – दिलीपराव देशमुख
04:23
Video thumbnail
Jalkot Accident News | जळकोटमध्ये अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; एकाचा मृत्यू, एक जखमी
01:22
Video thumbnail
Nanded News | आदिवासी महादेव कोळी समाजाचा मोर्चा; घटनात्मक हक्कांसह श्वेतपत्रिकेची मागणी
00:38
Video thumbnail
Nanded News | ऊस उत्पादकांच्या मागण्यांचे निवेदन दिले; बालाजी गाडे यांना ५ कोटींची नोटीस
02:16
Video thumbnail
Journalist First Reaction | पत्रकारांच्या नजरेतून लातूर जिल्हा बँकेचा निकाल
11:49
Video thumbnail
Dhiraj Deshmukh First Reaction| लातूर जिल्हा बँक निवडणुकीत ११ जागांवर विजय; धीरज देशमुख काय म्हणाले?
02:42
Video thumbnail
Election Update|लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक निकाल
04:13
Video thumbnail
Rushikesh Karad|"नीट बोला" आमदार पुत्राला पोलिसांनी झापलं!
00:22
Video thumbnail
Rushikesh Karad|"नीट बोला"आमदार पुत्राला पोलिसांनी झापलं!
01:07
Video thumbnail
Nanded News | पाकिस्तानी क्रीममध्ये 48 हजार पट पारा! फॉरेन्सिक अहवालात धक्कादायक निष्कर्ष
03:02
Video thumbnail
Nanded|शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी आंदोलन
05:43

Latest news