Homeलातूरपानगाव उप बाजारपेठेमुळे शेतक-यांना मिळणार मोठा आधार

पानगाव उप बाजारपेठेमुळे शेतक-यांना मिळणार मोठा आधार

रेणापूर : प्रतिनिधी
लातूर ग्रामीणचे माजी आमदार तथा लातूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष धिरज विलासराव देशमुख यांच्या सूचनेनुसार रेणापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती उमाकांत खलंग्रे, उपसभापती अ‍ॅड. शेषराव हाके-पाटील, संचालक प्रकाश सूर्यवंशी, विश्वनाथ कागले यांनी दि. २३ जुलै रोजी पुणे येथे पणन सहसंचालक यांची भेट घेतली व प्रस्तावित पानगाव उपबाजारपेठ आराखड्यासंदर्भात चर्चा केली. या वेळी पणन सह संचालकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना लातूर ग्रामीणचे माजी आमदार तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष धिरज विलासराव देशमुख यांनी सातत्याने ग्रामीण भाग व शेतकरी हित डोळ्यासमोर ठेवून काम केले आहे. लातूर ग्रामीणमधील विकासाला डोळ्यासमोर ठेवून रेणापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची उप बाजारपेठ पानगाव येथे सुरू होण्याच्या दृष्टीने त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. याच अनुषंगाने माजी आमदार धिरज विलासराव देशमुख यांच्या सूचनेनुसार रेणापूर बाजार समितीचे पदाधिकारी यांनी पणन सह संचालक, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, पुणे यांची भेट घेतली व विकास आराखड्यासंदर्भात सविस्तर चर्चा केली.
काँग्रेस पक्षाने सातत्याने विकासाच्या विचाराला अंगिकारला असून त्या विचारापासून कधीही दूर न जाता जनहिताच्या दृष्टीने काम केले जात आहे. पानगाव व पंचक्रोशीतील शेतक-यांसाठी प्रस्तावित रेणापूर कृषी उत्पन्न बाजार समिती उप बाजारपेठ मोठा आधार ठरणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR