पायाभूत सुविधा निर्मितीवर भर देणार

अहमदपूर : प्रतिनिधी
सर्वसामान्य नागरिकांना शिक्षण, आरोग्य, सिंचन, वीज यांसारख्या दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असून याकरिता विविध विकासकामांच्या माध्यमातून पायाभूत सुविधांच्या निर्मितीला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत असल्याचे प्रतिपादन सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी केले.
अहमदपूर येथे १५ कोटी रुपये खर्चून उभारण्यात येणा-या महसूल अधिकारी व कर्मचारी निवासस्थान इमारतीच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमास उपविभागीय अधिकारी श्रीमती मंजुषा लटपटे, तहसीलदार श्रीमती उज्वला पांगरकर, अधीक्षक अभियंता बाळासाहेब थोरात, कार्यकारी अभियंता सुग्रीव केंद्रे, भारतीय जनता पक्षाचे नेते दिलीपराव देशमुख, बाबासाहेब कांबळे, अहमदपूर नगराध्यक्ष स्वप्निल व्हत्ते, माजी सभापती अ‍ॅड.भारत चामे, जि.प.समाज कल्याण सभापती उत्तमराव माने, शिवानंद  हेंगणे,  अशोकराव केंद्रे, तालुकाध्यक्ष शिवाजीराव देशमुख, त्र्यंबक गुट्टे,  किशोर मुंडे, पंचायत समिती सभापती सुरज पाटील, उपसभापती अयोध्या केंद्रे, जिल्हा परिषद सदस्य प्रतीक्षा गुट्टे, उपनगराध्यक्ष अय्याज  शेख, जिल्हा परिषद सदस्य प्रफुलचंद्र गुंडरे, जिल्हा परिषद सदस्य अ‍ॅड. अजिंक्य देशमुख, जिल्हा परिषद सदस्य अश्विनकुमार नागराळे, महिला जिल्हाध्यक्ष मीनाक्षी शिंगडे, किसान सेल भाजपा अध्यक्ष राजकुमार मजगे, माजी नगराध्यक्षा श्रीमती अश्विनी कासनाळे, गटविकास अधिकारी पंकज शेळके, नगरसेविका सुप्रिया भालेराव, महेश अर्बन बँक उपाध्यक्ष निवृत्तीराव कांबळे, युवक जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांत भोसले, श्रीकांत बनसोडे, बाळू केंद्रे, श्रीकांत मजगे, अमित रेड्डी, राम नरोटे, शहराध्यक्ष अझरभाई बागवान, गंगाधरराव ताडमे, प्रकाश ससाने, किरणकुमार बारमाळे, भागवतराव गुट्टे, अशिष तोगरे, हुसेन मणियार, बालासाहेब पाटील आंबेगावकर, प्रदीप उर्फ मुन्ना कांबळे, अफरोज शेख, सय्यद युसुफ,  बाबु रुईकर, तानाजी राजे, बालाजी कातकडे, सादिक शेख, शिवाजीराव पाटील, रामदास कदम, उप अभियंता सुरज गौंड, विजय स्वामी हे उपस्थित होते.
    शेतक-यांना कर्जमुक्त करण्यासाठी राज्य शासनाने अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली आहे. लवकरच या योजनेचा प्रत्यक्ष लाभ शेतक-यांना देण्यास सुरुवात होणार आहे. यासोबतच शेतक-यांना मोफत वीज देण्याचा निर्णयही शासनाने घेतला आहे. समाजातील तळागाळातील घटकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. अहमदपूर मतदारसंघातील शेतक-यांना सिंचनासाठी दिवसा वीज मिळावी, याकरिता सौरकृषी पंप देण्यात येत असून नवीन विद्युत उपकेंद्र उभारणीस मंजुरी देण्यात आली आहे. तसेच ग्रामीण भागातील पाणीपुरवठ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
शहरात विविध प्रशासकीय इमारतींची उभारणी होत असल्याचे सांगून सहकारमंत्री पाटील म्हणाले की, पंचायत समिती व नगरपालिकेच्या माध्यमातून रस्ते विकासाची कामे हाती घेण्यात आली आहेत. यासोबत निर्माणाधीन इमारतींचे काम गतीने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. शहरात सहकार भवन उभारण्यासाठी मान्यता मिळाली असून त्याचे कामही लवकरच सुरू  होईल.  नागरिकांना प्रशासकीय सुविधा देणा-या महसूल विभागाच्या अधिकारी व कर्मचा-यांसाठी १५ कोटी रुपये मंजूर झाले असून त्यातून २० निवासस्थानांचे बांधकाम केले जाणार आहे. या प्रसंगी नगराध्यक्ष अ‍ॅड. स्वप्नील व्हत्ते, उपविभागीय अधिकारी मंजुषा लटपटे, व दिलीपराव देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुग्रीव केंद्रे यांनी केले तर आभार प्रदर्शन मंडळ अधिकारी गोविंद कुंभार यांनी मानले.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur -गवळी समाजाची 15 वर्षांची परंपरा कायम; आषाढ महोत्सवात भक्तांची गर्दी
03:25
Video thumbnail
Purna|आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्णा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम
02:40
Video thumbnail
Latur|वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी संभाजी सेनेचे आंदोलन
03:44
Video thumbnail
Nanded|: 'गुंगी गुडिया' वक्तव्यावरून राष्ट्रवादी आक्रमक; हर्षवर्धन सपकाळांविरोधात जोडे मारो आंदोलन
03:29
Video thumbnail
Latur|जळकोट तालुक्यात जलस्रोत तुडुंब; पाण्याचा प्रश्न मिटला, शिवार हिरवाईने नटले
01:14
Video thumbnail
Solapur| मोहोळमध्ये संजय राऊत यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
01:19
Video thumbnail
Latur|नांदेड–बिदर महामार्गावरील सिमेंट रस्त्याला मोठ्या भेगा; अपघाताचा धोका
00:59
Video thumbnail
Latur|शिवराज पाटील चाकूरकर यांच्या भव्य स्मारकाची तयारी; चार दिवसांत मोठा निर्णय!
03:22
Video thumbnail
Nanded|धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर राकेश टिकैतांचे मोठे वक्तव्य..
01:30
Video thumbnail
Latur|खरीप हंगामावर एल निनोचं सावट; शेतकऱ्यांची नजर आकाशाकडे
02:40
Video thumbnail
Latur|बोगस खत विकणाऱ्यांविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार
04:25
Video thumbnail
Parbhani|परभणी-गंगाखेड महामार्गाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह;202 कोटी खर्च करूनही महामार्गाची दुरवस्था
01:21
Video thumbnail
Nanded|नांदेड हादरलं! दहावीतील विद्यार्थ्याचा वर्गमित्रावर चाकू हल्ला
02:10
Video thumbnail
भूम तालुक्यातील आंबी जयवंतनगर मार्ग बंद;देवगावरोड वरील पूल गेला वाहून,अनेक गावांचा संपर्क तुटला
00:17
Video thumbnail
Nanded|हिमायतनगरमध्ये प्रशासनाचा बुलडोझर; उमर चौक अतिक्रमणमुक्त
01:29

Latest news