पुणे : प्रतिनिधी
पार्थ पवार यांच्या ‘अमेडिया’ कंपनीच्या कोरेगाव पार्क (मुंढवा) येथील ४० एकर जमीन विक्री प्रकरणात विजय कुंभार आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी एकत्र पत्रकार परिषद घेत राज्य सरकारला धारेवर धरले आहे. पुण्यातील जमीन घोटाळा प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्यावरही गुन्हा दाखल झाला पाहिजे. पण राजकीय दबावामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जात नाही, असा आरोपही दमानिया यांनी केला आहे.
गेल्या ५-६ वर्षांपासून हा घोटाळा सुरू आहे. एकच नोटरी वकिलाकडून बनवून घेतले आहे. यापूर्वी पार्थ पवारांच्या सहीचे पत्र दिले होते. पार्थ पवारांनी तेव्हा सांगितले की ते माझ्या सहीचे पत्र नाही. २५ मे २०२१ रोजी हा व्यवहार करून दिला आहे. ही सर्व कागदपत्रं सरकार दरबारी आहेत. अजित पवारांना हे सर्व माहीत होते आणि राज्यातले मुख्यमंत्री आणि महसूल मंत्री या प्रकरणात प्रोटेक्ट करत असल्याचा खळबळजनक दावा माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केला आहे.
ही पॉवर ऑफ अटॉर्नी आहे, यात मुंढव्याची जागा असून यात प्रत्येक पेजवर पार्थ पवारांची सही आणि त्यांचा फोटो देखील आहे. २०२१ मध्ये याच जमिनींची पॉवर ऑफ अटॉर्नी आहे. अॅडव्होकेट तृप्ता ठाकूर यांनी हे पाठवले आहे. तसेच दिग्विजय सिंह आणि शीतल तेजवानी यांच्या वकिलांनीही पाठवले आहे. तिने यात सर्व पाठवले आहे, यात चॅट देखील आहेत. संतोष हिंगणे आणि तृप्ता ठाकूर यांचे यात चॅटिंग आहेत. अजित पवारांचे पीए आणि तृप्ता ठाकूर यांचे चॅटिंग यात आहे. हे सर्व पोलिसांसमोर देखील गेले आहे. तरी पार्थ पवारांवर गुन्हा दाखल नाही. जर आज अजित पवार यांचा राजीनामा घेतला नाही तर आम्ही उद्या पुण्याला जाऊन त्यांचे नाव घाला असा इशारा देणार आहोत. असा आक्रमक पवित्रा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी यावेळी घेतला. शीतल तेजवानी आणि पार्थ पवार यांच्यात झालेला हा व्यवहार आहे. यात तीन तीन ओएसडी सहभागी आहेत, असेही त्या म्हणाल्या.
फक्त दिग्विजय पाटील आणि शीतल तेजवानी यांना अडकवले जात आहे. पार्थ पवार यांच्यावर काहीही कारवाई नाही म्हणून बहुतेक तृप्ता ठाकूर यांनी हे आम्हाला पाठवले आहे. कलेक्टरला तो पत्ता तृप्ता ठाकूर पाठवते. आम्ही जी याचिका दाखल करणार आहोत त्याला पहिले जबाबदार गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे असतील. अजित पवार संत नाहीत. ते असे म्हणतीलच की माहीत नाही. अजित पवारांचे ३ अधिकारी सामील आहेत. त्यांचे ढाकणे, राम चौबे, संतोष हिंगणे, विकास पाटील यांच्याशी चॅटिंग असल्याचे समोर आले आहे, असा दावाही अंजली दमानिया यांनी केला आहे.

