लातूर : प्रतिनिधी
लोकनेते विलासराव देशमुख ग्रामीण टी-१० क्रिकेट स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडत आहे. सोमवार दि. २५ मे रोजी लातूर लायन्स विरुद्ध चाकुर चार्जस या दोन संघात अंतिम सामना खेळवला जाणार होता. सामन्याचे नाणेफेक होताच पावसाचे आगमन झाले. काही वेळ पाऊस पडला आणि थांबला. पंच व दोन्ही संघांच्या कर्णधारांनी मैदानाची पाहणी केली. पंचांनी सामना सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे खेळपट्टीवरुन कव्हर काढत असतानाच पुन्हा पावसाचे जोरदार आगमन झाले. १० मिनिटे चांगला पाऊस पडल्याने पंचांनी अंतिम सामना रद्द केला. अंतिम सामना आज दि. २६ मे रोजी सकाळी ११.३० वाजता खेळवला जाणार आहे.
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष धिरज विलासराव देशमुख यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेला मागील ३ वर्षांमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. यंदा स्पर्धा नव्या स्वरूपात होत आहेत. लातूर लायन्स विरुद्ध चाकुर चार्जस या दोन संघात अंतिम सामना होणार होता. विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख, लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष धिरज विलासराव देशमुख, सौ. दीपशिखा धिरज देशमुख, वंश धिरज देशमुख, दिवियाना धिरज देशमुख यांच्या हस्ते ‘चषकाचे’ अनावरण करण्यात आले. त्यानंतर लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष धिरज विलासराव देशमुख यांच्या हस्ते अंतिम सामन्यासाठी नाणेफेक करण्यात आली.
लातूर लायन्सचा कर्णधार विशाल याने नाणेफेक जिंकुन क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि सामना सुरु होणार इतक्यात पावसाचे आगमन झाले. सामना थांबला. काही वेळ पाऊस पडला आणि थांबला. पंच आणि दोन संघांच्या कर्णधारांनी मैदानाची पाहणी केली. पंचांनी सामना सुरु करण्याचा निर्णय घेतला. मैदानावरी कव्हर काढत असताना पुन्हा पाऊस सुरु झाला. ब-यापैकी पाऊस पडल्याने संपूर्ण मैदानात पाणीच पाणी झाले. त्यामुळे पंचांनी सामना रद्द केला. स्पर्धेच्या संयोजन समितीने अंतिम सामना आज दि. २६ मे रोजी सकाळी ११.३० वाजता खेळवण्याचा निर्णय घेतला. यावेळी अॅड. प्रमोद जाधव, रविंद्र काळे, संतोष देशमुख, अनंतराव देशमुख, अॅड. प्रविण पाटील, विजयकुमार साबदे, अनुप शेळके, उमेश बेद्रे, राजकुमार पाटील, कैलास पाटील, सचिन दाताळ, स्नेहल उटगे, प्रदीप राठोड, किरण जाधव, सरवर शेख, जगदीश बावणे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेत १२ संघ सहभागी झाले आहेत. तरुणांचा उत्साह प्रचंड असून प्रेक्षकही मोठ्या प्रमाणात उपस्थित राहत आहेत.
















