मुंबई : प्रतिनिधी
सध्याच्या ऑक्टोबर हीटमुळे हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे. राज्यात अवकाळी पाऊस सुरू झाला असून, पुणे, मुंबई आणि सोलापूरसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या पावसामुळे तापमानात घट झाली असली तरी, गडचिरोलीसह अनेक भागांतील भात व कापूस पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पुढील दोन दिवस पाऊस कायम राहणार आहे.
सध्या दिवसभ ऑक्टोबर हीट जाणवत असून उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. मात्र आता याच उकाड्यादरम्यान पुण्यासह राज्यातील अनेक अनेक भागातील नागरिकांना दिलासा मिळू शकतो. तामिळनाडू, केरळ आणि दक्षिण भारतात २६ ते २८ ऑक्टोबर दरम्यान अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. या भागात रेड आणि यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे, त्याचा परिणाम परिणाम महाराष्ट्रातील हवामानावर होणार आहे.
पुण्यात यलो अलर्ट
पुण्यात पुढील दोन दिवस यलो अलर्ट देण्यात आला आहे. ऑक्टोबर हिटमुळे वाढलेल्या उघड्याने हैराण झालेल्या पुणेकरांना गेल्या दोन दिवसांपासून पडणा-या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. शहर आणि परिसरात गुरुवार आणि शुक्रवार पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे तापमानात मोठी घट झाली. तर आता पुढचे दोन दिवस मेघगर्जना आणि विजांचा कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच मुंबईतही पुढचे दोन दिवस पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
गडचिरोलीत भात पिकाचे मोठे नुकसान
गडचिरोली जिल्ह्यात काल रात्री परतीच्या पावसामुळे भात पिकाचं मोठं नुकसान झाले. २४ ऑक्टोबर रात्री एकपासून पहाटे चार वाजेपर्यंत जवळपास तीन ते असे परतीच्या पावसाने झोडपून काढले. पावसामुळे सध्या कापणी वर असलेल्या भात पिकाचे मोठे नुकसान झालेले आहे. जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने कापूस आणि भाताची शेतीचे नुकसान केले.
















