मुंबई : प्रतिनिधी
गेल्या काही दिवसांपासून एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर युतीतील भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात थेट आरोप करत आहेत. याचपार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रवींद्र धंगेकरांची रविवारी (१२ ऑक्टोबर) भेट घेत त्यांना महायुतीत दंगा नको, असा आदेश दिला आहे. तर दुसरीकडे नाशिकमध्ये पोलिस आयुक्त गुंडांवर कारवाई करताना दिसत आहेत. त्यामुळे आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नाशिकमध्ये कारवाईप्रकरणी मुख्यमंत्र्यांचे कौतुक करताना पुण्यामध्ये ठाण्याइतकीच जबरदस्त गुंडगुरी सुरू असल्याचा दावा केला आहे.
दरम्यान, पुण्यात गेल्या महिन्यात झालेल्या कोथरूड गोळीबार प्रकरणानंतर राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन घायवळ हा परदेशात फरार झाल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेचे तापलेआहे. अशामध्ये
महायुतीत पंगा नको : एकनाथ शिंदे
रविवारी १२ ऑक्टोबर रोजी रवींद्र धंगेकर यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. तेव्हा, महायुतीत पंगा नको असे धंगेकर यांना सांगण्यात आल्याची माहिती स्वत: एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना दिली. पण तरीही रवींद्र धंगेकर यांनी १३ ऑक्टोबर सोमवारी एका वृत्तवाहिनीशी बोलताना धंगेकर यांनी पुन्हा पुण्यातील गंडगिरीविरोधात स्थानिक नेत्यांवर टीका केली.
स्वत:चे राजकीय नुकसान सहन करेन : धंगेकर
रवींद्र धंगेकर म्हणाले की, वेळ पडली तर पुणेकरांसाठी स्वत:चे राजकीय नुकसान करायला तयार आहे. या सर्व प्रकरणांमध्ये मी पुणेकरांसाठी बोलत आहे. यावर बोलल्याने उलट माझे राजकीय नुकसान होत आहे. मात्र, त्याची किंमत मोजायला मी तयार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. एकनाथ शिंदे हे माझ्या पाठीशी उभे आहेत. त्यांनाही गुन्हेगारी नको असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले
पुण्याची राखरांगोळी केली : रोहित पवार
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार म्हणाले की, गुंडांकडून पुण्याची राखरांगोळी झाली तरी चालेल पण महायुतीत दंगा नको ही तिन्ही राज्यकर्त्यांची भूमिका आहे. सुलतान मिर्झाने गुंडांमध्ये कशी मुंबई वाटली तसंच पुणे देखील या तिन्ही पक्षांनी वाटून घेतले आहे, सीपी भाजपच्या पसंतीचा, मनपा आयुक्त शिवसेना शिंदे गटाच्या पसंतीचा तर कलेक्टर राष्ट्रवादी अजितदादा गटाच्या पसंतीचा अशी ही वाटणी आहे.

