पुणे : प्रतिनिधी
पुणे जिल्हा परिषद निवडणुकीत अजितदादांचे स्वप्न झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. जिल्ह्यात ७३ जागांपैकी तब्बल ४३ जागांवर विजय मिळवत अजितदादांच्या राष्ट्रवादीने एकहाती सत्ता मिळवली आहे. तर भाजपला ८ जागेवर समाधान मिळवावे लागले आहे. शिवसेना ५ उद्धवसेना ७ आणि शरद पवार पक्षाला १ जागा मिळाली आहे. २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत एकसंध राष्ट्रवादी काँग्रेसने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले होते. त्यात ७५ गटांपैकी ४४ गटांत विजय मिळवत पक्षाने एकहाती सत्ता मिळवली होती. त्याखालोखाल शिवसेनेने १३ जागांवर विजय मिळवला होता. भाजप आणि काँग्रेसला प्रत्येकी ७ जागा मिळाल्या होत्या, तर अपक्ष आणि इतर पक्षांना मिळून ४ जागांवर यश मिळाले होते. मात्र यंदाही पुन्हा पुण्यात घड्याळच दिसणार आहे.
बारामतीत झालेल्या अजित पवारांचा निधनानंतर संपूर्ण राज्यात निवडणूक शांततेत पार पडली. कोणत्याही पक्षाकडून प्रचार करण्यात आला नाही. विशेष म्हणजे अजितदादांच्या बारामतीत संथ गतीने मतदान झाले. जिल्ह्यात सर्वात कमी मतदान याठिकाणी झाले. या निवडणुकीसाठी जिल्हा परिषदेच्या ७३ गटांसाठी २९९ उमेदवार, तर पंचायत समित्यांच्या १४६ गणांसाठी ५२८ उमेदवार रिंगणात होते. आता तरी ४३ जागांवर राष्ट्रवादीने निर्विवाद वर्चस्व मिळवले आहे. मुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर जुने सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस आपला गड राखणार की विरोधक सत्तांतर घडवणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. अखेर अजितदादांचे स्वप्न पूर्ण करत राष्ट्रवादीने एकहाती सत्ता मिळवली आहे.
जिल्ह्यात राष्ट्रवादीचे सर्वाधिक आमदार
पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादीचे सर्वधिक आमदार आहेत. त्यांचा फायदा या जिल्हा प्रदशड निवडणुकीत झाल्याचे दिसून आले आहे. मावळ भागातही राष्ट्रवादीने भाजपच्या जागा खेचून आणत एकहाती सत्ता मिळवली आहे. जिल्ह्यात अजितदादांनी अनेक विकासकामे केली होती. त्यामुळे मतदारांनी घड्याळाला साथ देत राष्ट्रवादीला सत्ता मिळवून दिली आहे.

