पुणे जिल्ह्यात १० जागांवर राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष

पुणे : १४ नगरपरिषदा आणि ३ नगरपंचायती मध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीने बाजी मारली असून १० जागांवर वर्चस्व मिळवले आहे. तर एकनाथ शिंदे गटाला ४ आणि भाजपला ३ जागा मिळाल्या आहेत.
जिल्ह्यातील १४ नगरपरिषदा आणि तीन नगरपंचायतींच्या निवडणुकीमध्ये बहुतांश ठिकाणी निवडणूक रिंगणात महायुतीतील घटक पक्ष एकमेकांसमोर उभे राहिले होते. जिल्ह्यात सगळ्या ठिकाणी महायुतीने वर्चस्व मिळवले आहे. १४ नगरपरिषदा आणि ३ नगरपंचायती मध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीने बाजी मारली असून १० जागांवर वर्चस्व मिळवले आहे. तर एकनाथ शिंदे गटाला ४ आणि भाजपला ३ जागा मिळाल्या आहेत.

पुणे जिल्ह्यात महाविकास आघाडीला एकही जागा मिळाली नाहीये. अनेक ठिकाणी महायुतीतीलच घटक पक्षांची चुरशीची लढत झाली आहे. त्यामध्ये अजितदादांनी बाजी मारल्याचे समोर आले आहे. एकनाथ शिंदे गटानेही आपले उमेदवार निवडून आणले आहेत. या निकालानंतर एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधताना आता खरी शिवसेना कोणाची असं म्हणत एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. तर अजित पवारांनी बघा पुणे जिल्ह्यात कुणाचे वर्चस्व असं म्हणत मिश्किल टिपण्णी केली आहे. संपूर्ण राज्यात महायुतीला २०० पेक्षा अधिक जागा मिळाल्या आहेत. तर महाविकास आघाडीला ५० च्या आसपास जागा मिळाल्या आहेत.

पुणे जिल्ह्यातील नगराध्यक्ष विजयी उमेदवार

बारामती – नगराध्यक्षपदी सचिन सातव (राष्ट्रवादी अजित पवार गट)

लोणावळा – नगराध्यक्षपदी राजेंद्र सोनवणे (राष्ट्रवादी अजित पवार गट)

दौंड – नगराध्यक्षपदी दुर्गादेवी जगदाळे (राष्ट्रवादी अजित पवार गट)

तळेगाव दाभाडे – नगराध्यक्षपदी संतोष दाभाडे (भाजप)

चाकण – नगराध्यक्षपदी मनीषा सुरेश गोरे (शिवसेना शिंदे गट)

जुन्नर – नगराध्यक्षपदी सुजाता मधुकर काजळे (शिवसेना शिंदे गट)

आळंदी – नगराध्यक्षपदी प्रशांत कु-हाडे (भाजप)

शिरूर – नगराध्यक्षपदी ऐश्वर्या पाचर्णे (राष्ट्रवादी अजित पवार गट)

सासवड – आनंदी काकी जगताप (भाजप)

जेजुरी – नगराध्यक्षपदी जयदीप बारभाई (राष्ट्रवादी अजित पवार गट)

भोर – नगराध्यक्षपदी रामचंद्र आवारे (राष्ट्रवादी अजित पवार गट)

इंदापूर – नगराध्यक्षपदी भरत शहा (राष्ट्रवादी अजित पवार गट)

राजगुरुनगर – नगराध्यक्षपदी मंगेश गुंडाळ (शिवसेना शिंदे गट)

वडगाव – नगराध्यक्षपदी अबोली ढोरे (राष्ट्रवादी अजित पवार गट)

फुरसुंगी – नगराध्यक्षपदी संतोष सरोदे (राष्ट्रवादी अजित पवार)

मंचर – नगराध्यक्षपदी राजश्री दत्तात्रय गांजाळे (शिवसेना शिंदे गट)

माळेगाव – नगराध्यक्षपदी सुजय सातपुते (राष्ट्रवादी अजित पवार गट)

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
LIVE -एकमत कार्यालयातील दिवाळी लक्ष्मीपूजन सोहळा
00:00
Video thumbnail
Latur Diwali Firecracker Market | लक्ष्मीपूजनासाठी फटाका बाजारात गर्दी | शेतकऱ्यांना 20% सूट
03:31
Video thumbnail
Latur Diwali Shopping Rush | गंजगोलाई बाजारपेठेत तुफान गर्दी | वाहतूक कोंडी | एकमत डिजिटल
02:10
Video thumbnail
Latur Vanchit Bahujan Aghadi Black Diwali | दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी आंदोलन | एकमत डिजिटल
01:44
Video thumbnail
Jalkot Drought Diwali | दुष्काळामुळे जळकोटची दिवाळी फिकी | फुलांचे भाव घसरले | एकमत डिजिटल
02:50
Video thumbnail
PURNA| तालुक्यातील निळा-महागाव रस्त्याचा प्रश्न मार्गी|आ. डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या हस्ते भूमिपूजन
03:59
Video thumbnail
Latur Bus Stand Dirty Condition | मध्यवर्ती बसस्थानकात घाणीचे साम्राज्य | एकमत डिजिटल
02:32
Video thumbnail
Latur Gandhi Chowk Police Station | सलग पाचव्यांदा जिल्ह्यात प्रथम क्रमांक | एकमत डिजिटल
02:56
Video thumbnail
Latur Surya Dakshin Hotel Controversy | MR संघटनांची पोलिसांत तक्रार
02:45
Video thumbnail
Nanded Sachkhand Gurudwara Takht Snan | तख्त स्नानने दिवाळी पर्वाला सुरुवात
02:47
Video thumbnail
Latur|सूर्या दक्षिण हॉटेल मालकाच्या वक्तव्यावरून MR संघटना आक्रमक | निषेध आणि माफीची मागणी
04:04
Video thumbnail
Latur District Bank|आमचा दृश्यम नव्हे, शुद्ध रामायण” | धिरज देशमुख यांची विरोधकांवर सडेतोड टोला
05:39
Video thumbnail
LIVE -लातूर जिल्हा बँक निवडणुकीत सहकार पॅनलचा शंखनाद! बाबासाहेब पाटील, धीरज देशमुख मैदानात
01:40:24
Video thumbnail
LIVE "लातूर बँकेत मोठी राजकीय खेळी! बाबासाहेब पाटील अन् धीरज देशमुख एकत्र!"
01:03:28
Video thumbnail
Mahur|एमटीडीसी रस्ते बांधकामावर भीषण दुर्घटना | २० वर्षीय मजुराचा मिक्सर मशीनखाली मृत्यू
01:33

Latest news