30.4 C
Latur
Friday, February 13, 2026
Homeमहाराष्ट्रपुणे- मालेगाव महामार्गावर भीषण अपघात; ४ ठार, २० जखमी

पुणे- मालेगाव महामार्गावर भीषण अपघात; ४ ठार, २० जखमी

नाशिक : प्रतिनिधी
पुण्याहून मालेगावला निघालेल्या खासगी ट्रव्हल बसचा नाशिकमध्ये भयंकर अपघात झाला. पहाटे ३ वाजताच्या सुमारास बस आणि पिकअपची जोरात धडक झाली. या अपघातामध्ये ४ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. तर २० जण जखमी झाले आहे. मालेगाव-मनमाड महामार्गावर पहाटे ३ वाजता अपघात झाला. अपघातानंतर प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण होते. स्थानिकांनी धाव घेत तात्काळ मदतकार्य सुरू केले. पोलिसांनीही तात्काळ घटनास्थळावर धाव घेत मदतकार्य सुरू केले. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने जखमी प्रवाशांना तात्काळ जवळच्या रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

नाशिकच्या मालेगाव-मनमाड महामार्गावर पहाटे तीनच्या सुमारास व-हाणे गावाजवळ भीषण अपघात झाला. पुण्याकडून मालेगावकडे येणारी खासगी ट्रॅव्हल बस आणि पिकअप यांच्यात हा अपघात झाला. या अपघातात चार जण ठार झाले आहे, तर २२ जण जखमी झाले आहेत. त्यामधील २ जणांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर जवळच्या स्थानिक रूग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातात ठार झालेले सर्व चार जण हे मालेगाव येथिल रहिवाशी असल्याची माहिती समोर आली आहे.

अपघातानंतर ट्रव्हलमधील प्रवाशांमध्ये किंचाळ्या अन् आरडओरड ऐकू आल्याचे स्थानिकांनी सांगितलं. अपघात इतका भयंकर होता की पहाटे गावात दूरपर्यंत आवाज आला होता. त्यानंतर काही स्थानिकांनी तात्काळ घटनास्थळाकडे धाव घेत मदतकार्य सुरू केले. पोलिसांनीही तात्काळ घटनास्थळावर धाव घेतली. सर्व जखमींना मालेगावच्या सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. गाडीत अडकलेल्या सर्वांना पोलिस व स्थानिकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. पोलिस या अपघाताचा अधिक तपास करीत आहेत. दोन्ही वाहनाची जोरदार धडक झाली कशी ? याचा तपास पोलीस करत आहेत

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR