पुणे-सातारा महामार्गावर भीषण अपघात; ४ ठार

शिरवळ (पुणे) : प्रतिनिधी
पुणे-सातारा महामार्गावर शिरवळ येथे मंगळवारी (११ ऑगस्ट) पहाटेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात चार युवकांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य दोघे जखमी झाले आहेत. पुण्याहून साता-याच्या दिशेने जाणा-या कारवरील चालकाचं नियंत्रण सुटल्याने हा भीषण अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. शिरवळ येथील हॉटेल शिवालयसमोर पहाटे अपघात घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, कार पुण्याहून साता-याच्या दिशेनं जात होती. प्रवासादरम्यान चालकाचं कारवरील नियंत्रण सुटलं. त्यानंतर कार महामार्गावरील डिव्हायडरला जोरदार धडकून पलटी झाली. अपघाताची तीव्रता एवढी होती की पलटी झालेली कार विरुद्ध दिशेच्या लेनमध्ये जाऊन समोरून येणा-या ट्रकला धडकली. कार आणि ट्रकच्या या धडकेत कारचा अक्षरश: चक्काचूर झाला. या भीषण अपघातात कारमधील चार युवकांचा मृत्यू झाला.

मृतांमध्ये तळेगाव दाभाडे येथील वेदांत अर्जुन वारिंगे (१९), कामशेत येथील सोनलिंग धीरेंद्र ठाकूर (१९), टाकवे येथील आदित्य बाळासाहेब गरुड (१९) आणि कामशेत येथील निखिल बाळू राऊत (२०) यांचा समावेश आहे. सर्व मृत युवक हे मावळ परिसरातील रहिवासी असल्यानं या घटनेनं तळेगाव दाभाडे, कामशेत आणि टाकवे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या अपघातात दीक्षित दयानंद पुजारी (२०), रा. कामशेत आणि मयूर हनुमंत शिंदे (२०), रा. बहुर, कामशेत हे दोघे जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मृतांपैकी तिघेजण कुटुंबातील एकुलती एक मुले होती. सर्वजण महाबळेश्वरला फिरायला जात असताना काळानं चौघांवर झडप घातली.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये पिके सुकली! कोरडा दुष्काळ जाहीर करा, राजीव कसबेंची सरकारकडे मागणी
02:05
Video thumbnail
Latur|मातीपासून घडवला गणराया! केशवराज महाविद्यालयात १५० विद्यार्थ्यांचा अनोखा उपक्रम
02:53
Video thumbnail
Nanded|हदगावमध्ये मराठा आरक्षणासाठी एल्गार! शिवसेना आमदाराच्या कार्यालयातच आमरण उपोषण
02:28
Video thumbnail
Latur|एकमत डिजिटलच्या बातमीचा इम्पॅक्ट! लातूरला राज्यस्तरीय खो-खोचे यजमानपद
02:13
Video thumbnail
BIG BREAKING | तिरुका नदीत जळकोटच्या व्यक्तीचा मृतदेह; मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट
00:57
Video thumbnail
SOLAPUR|पडळकरांचा ताफा अडवला! मराठा आंदोलकांचा थेट सवाल; आरक्षणावर आमदारांनी स्पष्ट केली भूमिका
01:42
Video thumbnail
LATUR|गवळणीच्या सुरांनी लातूर दुमदुमलं! वासुदेव समाजाचा जन्माष्टमी सोहळा थाटात
03:55
Video thumbnail
LIVE- महाराष्ट्रातील दिवसभरातील महत्त्वाच्या आणि झटपट घडामोडी.
08:14
Video thumbnail
BIG BREAKING | लातूर ट्रॅफिक पोलिसांचे मिशन ऑल आऊट! फटाका सायलेंसर, रॉंग साईड, मोबाईलवर कारवाई
02:01
Video thumbnail
BIG BREAKING | लातूर पोलिसांचा धडाका! ५९ हरवलेले मोबाईल शोधून मालकांना परत
03:31
Video thumbnail
Nanded Maratha Protest|मराठा रॅलीत आमदारांना धक्का! घोषणाबाजीनंतर काढता पाय
02:26
Video thumbnail
Latur|ऑक्टोबरमध्ये रंगणार थरार; लातूरच्या खेळाडूंची तयारी पाहा
03:24
Video thumbnail
Latur | लांबच्या प्रवासातील महिलांचे हाल संपणार? पेट्रोल पंपांवर स्वच्छ शौचालयांसाठी मोठा पुढाकार
05:46
Video thumbnail
BIG BREAKING | मराठा आरक्षणासाठी बोरगाव काळेत उपोषण सुरू; मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलनाचा निर्धार
00:32
Video thumbnail
BIG BREAKING | नांदेड बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद! सकाळपासून बाजारपेठा बंद, मराठा समाजाची मोठी रॅली
00:51

Latest news