31.1 C
Latur
Saturday, February 14, 2026
Homeमहाराष्ट्रपुण्यात एआरएआयतर्फे ‘एसआयएटी २०२६’ आंतरराष्ट्रीय परिषदचे आयोजन

पुण्यात एआरएआयतर्फे ‘एसआयएटी २०२६’ आंतरराष्ट्रीय परिषदचे आयोजन

पुणे : प्रतिनिधी
ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात एआरएआयच्या वतीने येत्या मंगळवार, दि. २७ जानेवारी ते शुक्रवार, दि. ३० जानेवारी, २०२६ दरम्यान ‘सिम्पोझियम ऑन इंटरनॅशनल ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजी (एसआयएटी २०२६)चे आयोजन करण्यात आले आहे. एआरएआयचे संचालक आणि एसआयएटी २०२६ चे अध्यक्ष डॉ. रेजी मथाई यांनी पत्रकार परिषदेत माहिती सांगितली.

मोशी येथील पुणे इंटरनॅशनल एक्झिबिशन अँड कन्व्हेन्शन सेंटर (पीआयईसीसी) येथे परिषदेचे आयोजन करण्यात येणार आहे. उद्घाटन केंद्रीय अवजड उद्योग व पोलाद मंत्री एच. डी. कुमारस्वामी आणि केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत होईल, समारोप समारंभाला केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी व केंद्रीय अवजड उद्योग व पोलाद मंत्रालयाचे राज्यमंत्री भूपती राजू श्रीनिवास वर्मा उपस्थित असणार आहेत.
प्रदर्शनाविषयी माहिती देताना एम. आर. पाठक म्हणाले की, ‘‘एसआयएटी एक्स्पो २०२६ हे वाहनउद्योग क्षेत्रातील जागतिक कंपन्यांसाठी त्यांची उत्पादने, तंत्रज्ञान, नवकल्पना आणि सेवा इतरांपुढे प्रदर्शित करण्यासाठी एक आदर्श व्यासपीठ असून यामुळे अर्थपूर्ण औद्योगिक संवादाला चालना मिळण्यास मदत होते.’’ या प्रदर्शनात १० देशांतील ३८७ स्टॉल्स आणि २७५ प्रदर्शक सहभागी होत आघाडीच्या ओईएम्स, टियर-१ पुरवठादार, स्टार्टअप्स आणि संशोधन संस्थांच्या नवीनतम नवकल्पना प्रदर्शित करतील. प्रदर्शनामध्ये स्टार्टअप्स आणि सूक्ष्म व लघु उद्योगांसाठी समर्पित असे वेगेळे पॅव्हेलियन असणार आहे.

एसआयएटी प्रदर्शनामध्ये एडीएएस, एआय, ऑटोनॉमस ड्रायव्हिंग, सॉफ्टवेअर- ड्रिव्हन मोबिलिटी आणि अ‍ॅडव्हान्स ऑटोमोटिव्ह टेक्नोलॉजीज यांविषयात काम करणा-या संस्थांसाठी समर्पित असे विशेष तंत्रज्ञान पॅव्हेलियन देखील असेल. याला पूरक म्हणून एसआयएटी एक्स्पोमध्ये सुरक्षित आणि शाश्वत गतिशीलतेसाठी भविष्यातील गतिशीलता उपायांशी सुसंगत व प्रगत चाचणी तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित करणारे पॅव्हेलियन असेल. एसआयएटी एक्स्पोमधील टेक्नॉलॉजी थिएटरमध्ये सादरीकरणे आणि चर्चासत्रे यांचे आयोजन देखील करण्यात आले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR