- Advertisement -
पुणे : प्रतिनिधी
पुणे शहराच्या पश्चिमेकडील बावधन ते वारजे दरम्यानच्या महामार्गावर रविवारी एक धक्कादायक अपघात घडला. वेद विहार परिसरात भरधाव वेगाने जाणारी रिक्षा अचानक रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या डिव्हायडरवर आदळली. या भीषण अपघातात रिक्षाचालक रिक्षामध्ये अडकून पडल्याने एकच खळबळ उडाली होती.
अपघात झालेली रिक्षा इतकी चिरडली गेली होती की चालक गणेश कोळसकर (वय ३५) यांना बाहेर काढणं अत्यंत कठीण झालं होतं. घटनेची माहिती मिळताच वारजे फायर स्टेशन आणि ठऊअ अग्निशमन अग्निशमन दलाच्या जवानांनी विशेष ‘स्प्रेडर कटर’ उपकरणाच्या साहाय्याने रिक्षेचे भाग कापून, अत्यंत काळजीपूर्वक गणेश कोळसकर यांची सुटका केली. त्यांचे दोन्ही पाय रिक्षामध्ये अडकले होते. जवानांनी अत्यंत नियोजनबद्धपणे ही कारवाई करत त्यांना बाहेर काढले.
- Advertisement -
















